
सफाई कामगाराचे भविष्य निर्वाह निधी भरण्याची कंत्रटदारावर नामुष्की आंदोलनाचे फलीत
(कोरपना ता प्र )
चंद्रपूर जिल्ह्यातील सफाई कामगार भविष्य निर्वाह निधी घोटाळा किमान वेतन कायद्याचे उल्लंघन करून कामगारांचे शोषण कंत्राटदाराकडून गेल्या आठ-दहा वर्षांपासून सुरू होते मात्र सफाई कामगारांनी 2 ऑक्टोंबर गांधी जयंती दिनी धरणे आंदोलनाचे शस्त्र उगारून कोरपणा नगरपंचायतीच्या घनकचरा व्यवस्थापन कामात कामगारांचे शोषण व पगारामध्ये बँक खात्यावर पैसे जमा न करता परस्पर मंजूर रक्कम अपहार करून नाममात्र रक्कम देऊन शोषण केल्याने कोरपणा नगरपंचायतीचा भ्रष्टाचाराचा भंडाफोड होऊन पितळ उघडे पडले सहाय्यक आयुक्तअंमलबजावणी कक्ष येथील निरीक्षक यांनी कोरपना नगरपंचायतीला भेट देऊन कामगारांची मुलाखत घेतली व नगरपंचायतीच्या दिरंगाईमुळे कंत्राटदारांनी भविष्य निर्वाह निधी मध्ये झालेला गैरव्यवहार व अनियमितता आढळून आलेअसता कायद्याचे उल्लंघन होत असताना भविष्य निर्वाह निधी न भरता पगार कसे काय काढण्यात आले याबद्दल तंबी देत संपूर्ण रेकॉर्ड उपलब्ध करून देण्याच्या सूचना आरोग्य निरीक्षक शंकर तांड्रा यांना दिले व कामगार आयुक्त यांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेत सुनावणी घेऊन याबाबतचे संपूर्ण रेकॉर्ड पगार पत्रक व इतरमाहिती घेऊन कंत्रदारासह आरोग्य निरीक्षक यांनी पुढील महिन्याच्या सुनावणीला हजर राहण्याची संधी दिली यामुळे भ्रष्टाचारी कंत्राटदार कामगारांचे शोषण करणारे भूषण इटणकर व रक्षक सेक्युरिटी खडबडून जागे झाले व त्यांनी आपले पाप लपविण्याकरितागेल्या आठ नऊ वर्षापासून हडप केलेली भविष्य निर्वाह निधीची रक्कम काही कामगाराच्या खात्यात टाकल्यामुळे ज्या रकमेची आशा सोडून दिली होती मात्र आंदोलनाच्या धसक्याने सफाई कामगारांना दिवाळीच्या तोंडावर दोन लाख दीड लाख एक लाख 80 हजार अशा रकमा पडल्याने कामगाराच्या चेहऱ्यावर हसू दिसून आले मात्र कामगारांच्या तफावचीची रक्कम अजून खात्यावर पडलेली नाही व पि एफ सुद्धा पूर्ण मिळाला नसला तरी आता आम्हाला थकीत पगार पीएफ रक्कम व तफावत रक्कम मिळणार असल्याने सफाई कामगाराच्या कुटुंबात आनंद दिसून आला या संपूर्ण प्रकरणांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव आबिद अली भाजपाचे गटनेते गीता ताई डोहे नगरसेवक तथा भाजपा शहर अध्यक्ष अमोल असेकर यांनी याबाबतचा पाठपुरावा करीत आमदार देवराव भोंगळे यांच्याकडे ही बाब निदर्शनास आणून दिली होती याची दखल घेत प्रशासनाकडे पाठपुरावा झाल्यामुळे कंत्रटदाराकडून करण्यात आलेली फसवणूक व शोषण प्रकरणी दखल घेतल्यामुळे कामगारांनी न्याय मिळाल्याची चर्चा गावभर सुरू आहे सफाई कामगाराचे आशा पल्लवित झाल्या आहेत
