
मुंबई विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन तायक्वांदो स्पर्धेत आर्यन येवलेला सुवर्णपदक खालसा कॉलेजच्या आर्यन येवलेची उल्लेखनीय कामगिरी; क्रीडा क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव
मुंबई :- मुंबई विद्यापीठाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आंतरमहाविद्यालयीन तायक्वांदो स्पर्धा २०२६ मध्ये आर्यन येवले याने उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले.ही स्पर्धा २५ ते २८ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त),रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आली आहे.
आर्यन येवले खालसा कॉलेज मध्ये शिकत असून, तायक्वांदो खेळातील कौशल्य,जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर हे यश संपादन केले.त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे खालसा कॉलेज चे प्रिन्सिपल,क्रिडा शिक्षक,तायक्वांडो प्रशिक्षक राजेश मुरव यांनी आर्यन चे अभिनंदन केले आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून,क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आंतरराष्ट्रीय तायक्वॉदो प्रशिक्षक संदिप येवले, राजेश मुरव,पूनम येवले,वैष्णवी बाणखेले यांचे आर्यनला मार्गदर्शन मिळत असून.आर्यनच्या या यशामुळे तायक्वांदो खेळातील युवा खेळाडूंना प्रेरणा मिळणार आहे.
