शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सरासरी ही 94=70 % २६ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सरासरी ही 94=70 % २६ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकी साठी मालेगाव येथे गुरुवारी (२३ ऑक्टोबर) उत्साहात मतदान पार पडले. तहसील कार्यालय येथे सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत झालेल्या मतदानात 415 एकूण मतदारापैकी पुरुष = 337 , स्त्री = 56 असे
एकूण 393 मतदारांनी आपले मत नोंदवले आहे. त्याची सरासरी ही 94=70 %
झाली आहे. या निवडणुकीच्या रिंगणातील २६ उमेदवारांचे भवितव्य आता मतपेटीत बंद झाले आहे.
मतदान प्रक्रियेला सकाळी संथ सुरुवात झाली. मात्र, दिवस पुढे सरकताच मतदानासाठी येणाऱ्या शिक्षक मतदारांची संख्या वाढली. दुपारनंतर मतदानाचा वेग वाढल्याने मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा दिसून आल्या. अखेर निर्धारित वेळेत मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. या निवडणुकीत मतदारांना पसंतीक्रमानुसार मतदान करायचे असल्याने मतदानासाठी तुलनेने अधिक वेळ लागत होता. प्रत्येक मतदाराला मतपत्रिकेवर पसंतीक्रम नोंदवावा लागत असल्यामुळे मतदान केंद्रावर काही काळ गर्दी झाली. परिणामी, मतदानासाठी आलेल्या मतदारांना रांगेत प्रतीक्षा करावी लागली. असे असले, तरी शिक्षक मतदारांनी मतदानात सहभाग नोंदविल्याने सरासरी ही 94=70 % झाली आहे.
मतदानानंतर आता सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. २६ उमेदवारांपैकी शिक्षक मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने लागतो, हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *