
अंबिका माता संस्थान अमानी येथे महाप्रसाद वाटप दर्शनासह महाप्रसादाचा लाभ भाविकांनी मोठ्या संख्येने घेतला
वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)
दि १९ :- मालेगाव तालुक्यातील अमानी येथील गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या गडावरची देवी जय अंबिका मातेचे जागृत देवस्थान प्रसिद्ध असून गावकऱ्यांनचे श्रध्दास्थान असलेल्या या मंदिराजवळ दरवर्षीप्रमाणे नवरात्रात सकाळ व सायंकाळी आरतीसाठी व दर्शनासाठी फार मोठ्या प्रमाणात गर्दी असते तसेच नवव्या दिवशी , गावकरच्या वतीने आयोजित महाप्रसादाचा वाटप करण्यात येत असतो, नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना तसेच पूजा आरती करण्यात येत असून शेवटच्या दिवशी होम हाऊस तसेच पूजा आरती झाल्यानंतर लगेच सकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत असते, दशनासह महाप्रसादाला महिला सह गावकरी मंडळी मोठ्या संख्येने घेतात, तसेच गावात सती माता मंदिर सह अंबिका माते जवळ नवरात्र मध्ये रोज रात्री भाविकासाठी जेवणाची व्यवस्था करण्यात येत असते, गावात सार्वजनिक नवदुर्गा ची स्थापना आदिवासी वेटाळामध्ये असलेल्या मंदिराजवळ तसेच दुसऱ्या ठिकाणी सुद्धा आदिवासी बांधवांच्या वतीने नवदुर्गाची स्थापना करण्यात आली असून तसेच संत गजानन महाराजांच्या संस्थान जवळ व मारुतीच्या मंदिराजवळ देखील नवदुर्गाचे मंडळच्या वतीने स्थापना करण्यात आली आहे सार्वजनिक नवदुर्गा मंडळाच्या समोर देखील रोज सकाळी व सायंकाळी नियमित मंडळाच्या वतीने पूजा आरती करण्यात आली असून आज दिनांक 19 ऑक्टोबर रोजी सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते गावात नवरात्रात सर्वत्र भक्तीमय वातावरण होते
