शेगावच्या रेशन दुकानदाराच्या मनमानीविरोधात युवा स्वाभिमान पार्टी आक्रमक

शेगावच्या रेशन दुकानदाराच्या मनमानीविरोधात युवा स्वाभिमान पार्टी आक्रमक महिनाभरापासून तक्रार प्रलंबित; जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना महिलांनी विचारला जाब आठवडाभरात चौकशी करण्याचे अधिकाऱ्यांचे आश्वासन

कार्यकारी संपादक अमीन शेख शेगाव

शेगाव येथील सरकारी स्वस्त धान्य रेशन दुकानदाराच्या कथित मनमानी व अनियमित कारभाराविरोधात युवा स्वाभिमान पार्टीने आक्रमक भूमिका घेतली आहे. संबंधित रेशन दुकानदाराविरोधात एक महिन्यापूर्वी जिल्हा पुरवठा अधिकारी, बुलढाणा यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. मात्र, तक्रार करूनही अद्याप चौकशी का करण्यात आली नाही, असा थेट सवाल उपस्थित करत युवा स्वाभिमान पार्टीच्या जिल्हा महिला अध्यक्षा मनीषा नालट यांनी आपल्या सहकाऱ्यांसह जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना जाब विचारला.रेशन दुकानातील कथित अनियमिततेच्या तक्रारीवर प्रशासनाकडून वेळेत कार्यवाही का झाली नाही, याबाबत महिला पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. सर्वसामान्य नागरिकांना शासकीय रेशन धान्याचा लाभ मिळताना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये आणि तक्रारींची गांभीर्याने दखल घेतली जावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.अधिकाऱ्यांचे आठवडाभरात चौकशीचे आश्वासन!तक्रारीवर अद्याप चौकशी न झाल्याबद्दल पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी एका आठवड्याच्या आत चौकशी करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे आता शेगाव येथील संबंधित रेशन दुकानाच्या कारभाराची चौकशी नेमकी कधी सुरू होते आणि त्यातून काय निष्पन्न होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.महिला पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची उपस्थिती या वेळी युवा स्वाभिमान पार्टीच्या जिल्हा महिला अध्यक्षा मनीषा नालट यांच्यासह जिल्हा महिला संपर्कप्रमुख ऊषाताई साळवे, निशा वानखडे, प्रतिभा सावदेकर, संगीता गवई, संग्रामपूर तालुका अध्यक्ष रवी सोळंके, दत्ता नालट, अमजत अली, शाहरुख खान आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *