शेतीसह जंगलक्षेत्राचे रक्षण करणारी वाघामाय नवरात्र विशेष

शेतीसह जंगलक्षेत्राचे रक्षण करणारी वाघामाय नवरात्र विशेष

वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)

तालुक्यातील डोंगराळ भाग म्हणून ओळखला जाणाऱ्या किन्हिराजा येथून जवळच असलेल्या मैराळडोहची जंगल क्षेत्रातील व सोनाळा प्रकल्पाच्या पायथ्याशी वसलेलेल्या वाघामाय चे पुरातन मंदिर हे निसर्ग रम्य ठिकाणी वसलेले असून या भागातील शेतशीवार व जंगलक्षेत्राचे रक्षण करणारी वाघामाय हे जागृत देवस्थान समजले जाते.
शारदेय नवरात्र उत्सवाला सुरवात झाली असून अती प्राचीन व सर्वात जुने देवस्थान म्हणून मैराळडेह शेतशीवारातील वाघामाय आहे. मैराळडेह गावापासून उत्तरेकडे जसजशे नदीचा प्रवाह सोनाळा धरणाला मिळते त्याच वाटेवर घनदाट. जंगलात हे प्राचीन मंदिर आहे. पूर्वाभिमुख असलेल्या या जागृत मंदिरात वाघामाय प्रस्थापित असून चहुबांजुनी घनदाट जंगल सागवानी झाडे व मंदिराच्या पश्चिमेला सोनाळा धरणाचे पाणी वाहते रस्त्याची निर्मिती होण्याआधी याच देवी मंदिर परिसराच्या समोरूनच पाऊलवाट. होती अनेकजण या ठिकाणावरून येजा करीत असत काही वाटसरू वाट चुकले व रात्रीच्या वेळी या मंदिरात विसाव्यासाठी थांबले तेथेच गाढ झोपेत वाटसरू झोपलेले असतांना चक्क मंदीर परिसरात वाघांचा कळप आला माता वाघामाय जणु त्यांच्याशी वार्तालाप करीत असल्याचा भास या वाटसरुना आला तेव्हापासून या देवीला वाघामाय असे नामकरण करण्यात आले दैवी शक्ती वाघामायची कृपादृष्टी अशी आहे या जंगलातून या परिसरातील शेतातून आतापर्यन्त लाकूड ही कोणी नेल नाही व शेतकऱ्यांचे नुकसानही होवु दिल नाही परिसरातून कोणी लाकूड ही तोडून नेत नाहीत लाकडाची मोळी नेत नाहीत व या शेतशीवार परिसरात चेारीही होत नाही ही अख्यायीता वाघामायची प्रसिद्ध आहे व ते आज ही कायम आहे म्हणुनच या वाघामायला जंगल क्षेञा सोबतच शेतकऱ्यांचे रक्षण करणारी व चक्क वाघाशी संपर्क करणारी वाघामाय म्हणतात या मंदिराचे जीर्णोद्धार ग्रामस्थांनी केले असून या ठिकाणी दरवर्षी पोळ्यांच्या दुसऱ्या दिवशी करेच्या दिवशी भव्य कुस्तीची स्पर्धा मैराळडोहवासीय मोठ्या उत्साहात पार पाडतात व वनराञ उत्सवात ही या ठिकाणी आरती महाप्रसादाचे वाटप करण्यात येते भक्तांच्या हाकेला वो देवुन त्यांच्या दुखाचे हरण करणारी मैराळडोहची वाघामाय हे एक प्राचीन व जागृत देवस्थान किन्हिराजा पासुन पाच किलोमीटर अंतरावर मैराळडोह गावापासून उत्तरेस ३ किलोमीटर अंतरावर जंगल क्षेत्रात गेल्या अनेक वर्षापासून प्रस्थापित आहे.
नवरात्र उत्सवात येथे भाविकांची गर्दी असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *