दादाराव सोनोने यांची आरोग्य सेवक पदावर नियुक्ती बोर्डी गावात,व मित्रपरिवारात आनंदाचे वातावरण

दादाराव सोनोने यांची आरोग्य सेवक पदावर नियुक्ती बोर्डी गावात,व मित्रपरिवारात आनंदाचे वातावरण

अकोला जिल्हा प्रतिनिधी देवानंद खिरकर

अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या ग्राम बोर्डी येथील दादाराव सोनोने यांची खंडाळा येथे आरोग्य सेवक पदावर नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.त्यांची नियुक्ती झाल्या बद्दल बोर्डी गावात तसेच मित्रपरिवारात सर्वत्र अभिनंदन होत आहे.त्यांच्या या यशामुळे कुटुंबीय,मित्रपरिवार आणि समस्त गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.समुदाय आरोग्य अधिकारी हे ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात.उपकेंद्र व आरोग्य आणि कल्याण केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे,माता व बालकांचे आरोग्य,कुटुंब नियोजन,विविध आजारांवरील प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच आरोग्यविषयक जनजागृती करणे,अशा महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या या पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांवर असतात.त्यांच्या या निवडीमुळे गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.दादाराव सोनोने हे अत्यंत मनमिळाऊ,व प्रामाणिक स्वभावाचे आहेत.त्यांनी बोर्डी ग्राम पंचायत येथे अगदी तूटपुंज्या अनुदानावर त्यांनी लिपिक या पदावर सुरुवातीला साथ आठ वर्ष कामकाज पहिले.बोर्डी येथे काम सुरू असतानाच अचानक त्यांची पोपटखेड पी एसी येथे नियुक्ती झाली.तेथे ते रुजू झाले तेथे सुध्दा दोन वर्ष कामकाज पाहिले.आता त्यांची खंडाळा येथे आरोग्य सेवक पदावर नियुक्ती झाली व तेथे रुजू होणार आहेत.जिद्द,चिकाटी,मेहनतीच्या जोरावर व आई,वडिलांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी असल्यामुळे हे सर्व शक्य झाले असल्याचे दादाराव सोनोने यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलतांना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *