जामोद येथे मीनल दामधर फ्रेंड्स ग्रुप कडून आयोजित निःशुल्क गरबा वर्कशॉप व भव्य गरबा इव्हेंट उत्साहात संपन्न

जामोद येथे मीनल दामधर फ्रेंड्स ग्रुप कडून आयोजित निःशुल्क गरबा वर्कशॉप व भव्य गरबा इव्हेंट उत्साहात संपन्न

जळगाव जामोद प्रतिनिधी

जामोद !६०० हून अधिक मुली व महिलांचा उत्स्फूर्त सहभाग; गरबा क्वीनचा बहुमान ज्योती धुरडे व वृषाली धुरडे यांना संयुक्तपणे तर वैष्णवी पांडुरंग केदार ला गरबा प्रिन्सेसचा बहुमान जामोद : महिलांच्या आत्मविश्वासाला बळ देणारा, मैत्री, स्वाभिमान आणि एकतेचा संदेश देणारा जामोद महिला गरबा महोत्सव २०२६ अंतर्गत आयोजित निःशुल्क गरबा वर्कशॉप व भव्य महिला गरबा इव्हेंट मोठ्या उत्साहात पार पडला. या महोत्सवात ६०० पेक्षा अधिक मुली व महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. मीनल समाधान दामधर फ्रेंड्स ग्रुपच्या वतीने आयोजित या उपक्रमात ट्रेनर सौ माधुरी दातीर मॅडम यांच्या चार दिवसीय वर्कशॉप व मेगा इव्हेंट मुळे जामोद परिसरात नवरात्रोत्सवाचे उत्साही वातावरण निर्माण झाले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत जामोदच्या लोकनियुक्त सरपंच सौ. गंगुबाई पुंडलिकराव दामधर होत्या. कार्यक्रमाचे उद्घाटन भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाच्या पक्षनेत्या डॉ. स्वातीताई वाकेकर यांच्या हस्ते झाले. प्रमुख उपस्थितीमध्ये काजेगावच्या सरपंच तथा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) महिला जिल्हाध्यक्ष सौ. वर्षाताई वाघ, जळगाव जामोदच्या नगरसेविका वैशालीताई तायडे, साई मंगल गारमेंटच्या संचालिका जयश्रीताई सौदागर, गरबा ट्रेनर आरतीताई पलन, सुनगावच्या ग्रामपंचायत सदस्या कविताताई ढगे, ग्रामपंचायत सदस्या प्रमिलाताई हागे आणि सविताताई ढगे यांची उपस्थिती होती.या महोत्सवात चार दिवसांचे निःशुल्क गरबा प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. माधुरी मॅडम यांनी प्रशिक्षणाद्वारे सहभागी मुली व महिलांना गरब्याच्या विविध स्टेप्स, ताल, लय आणि सादरीकरणाचे मार्गदर्शन केले. प्रशिक्षणाचा लाभ घेत अनेक महिलांनी आत्मविश्वासाने गरबा सादर केला. महिलांना सांस्कृतिक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांच्यातील कला, कौशल्य आणि एकजूट वाढविण्याचा या उपक्रमाचा उद्देश होता.“गरबा म्हणजे महिलांच्या आत्मविश्वास, मैत्री, स्वाभिमान आणि एकतेचा उत्सव,” असे मत आयोजिका मीनल समाधान दामधर यांनी व्यक्त केले. महिलांनी घरगुती जबाबदाऱ्यांसोबत स्वतःच्या आवडी-निवडी, कला आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठीही वेळ द्यावा, हा या उपक्रमामागील प्रमुख हेतू असल्याचे त्यांनी सांगितले.तर “आयुष्यातील कुठलेही आव्हान स्वीकारण्यास स्त्रीशक्ती समर्थ असल्याचे मत उद्घाटक स्वातीताई वाकेकर यांनी व्यक्त केले” गरबा इव्हेंटमध्ये सहभागींचे वयानुसार चार गट करण्यात आले होते. यामध्ये १२ वर्षांपर्यंतच्या मुली, १२ ते २५ वर्षे वयोगटातील मुली, २५ ते ४० वर्षे वयोगटातील महिला आणि ४० वर्षांवरील महिलांचा समावेश होता. प्रत्येक गटातून तीन विजेत्यांची निवड करण्यात आली. याशिवाय गरबा क्वीन, गरबा प्रिन्सेस, बेस्ट ड्रेसिंग आणि प्रोत्साहनपर पुरस्कार देऊन सहभागींचा गौरव करण्यात आला.गरबा क्वीन म्हणून ज्योती अनिल धुरडे आणि वृषाली दिनेश धुरडे यांची संयुक्तपणे निवड करण्यात आली, तर वैष्णवी पांडुरंग केदार हिने गरबा प्रिन्सेसचा बहुमान पटकावला. बेस्ट ड्रेसिंगचा पुरस्कार सुरेखा प्रदीप बोबडे यांना मिळाला.गटनिहाय विजेत्यांची यादीगट क्रमांक १ : १२ वर्षांपर्यंतच्या मुली- साची प्रदीप बोबडे- गौरी मारुती ढगे- दिया सुनील धुरडे- मनस्वी निलेश गावंडेगट क्रमांक २ : १२ ते २५ वर्षे वयोगटातील मुली- आरती दाभाडे- प्रिया वसंत हागे- पूजा बबन दलालगट क्रमांक ३ : २५ ते ४० वर्षे वयोगटातील महिला- शीतल हिस्सल- पूनम अभिजीत वाघमारे- आशा दिनकर हिस्सलगट क्रमांक ४ : ४० वर्षांवरील महिला- राठोड ताई- वंदना देविदास दामधर- जयमाला दलालया स्पर्धेत मुख्य पुरस्कारांसह गटनिहाय विजेते, बेस्ट ड्रेसिंग आणि प्रोत्साहनपर पुरस्कार अशा विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. सहभागी महिलांच्या उत्साहपूर्ण प्रतिसादामुळे संपूर्ण कार्यक्रमाला रंगत आली.महिलांना निःशुल्क प्रशिक्षण, स्पर्धेची संधी आणि स्वतःची कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणारा हा उपक्रम जामोदच्या सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय उपक्रम ठरला. महिलांचा वाढता सहभाग आणि त्यांच्यातील उत्साह पाहता अशा उपक्रमांमुळे सामाजिक एकोपा, आत्मविश्वास आणि सांस्कृतिक परंपरांचे जतन होण्यास निश्चितच मदत होईल.कार्यक्रमाच्या आयोजनाचे सर्व महिला स्तरातून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *