७ दिवसांत अहवाल देण्याचे DHO चे आदेश.अखेर तालुका आरोग्य कार्यालय फेर चौकशी च्या जाळ्यात

​सिंदखेड राजा THO कार्यालय गैरकारभार: DHO कडून फेरचौकशी समिती गठीत पत्रकाराच्या आक्रमक पवित्रा व उपोषणाच्या इशाऱ्या नंतर प्रशासन हरकतीत ७ दिवसांत अहवाल देण्याचे DHO चे आदेश.अखेर तालुका आरोग्य कार्यालय फेर चौकशी च्या जाळ्यात

प्रतिनिधी बुलढाणा नागेश सुरगे

​बुलढाणा : सिंदखेड राजा तालुका आरोग्य अधिकारी (THO) कार्यालयातील गैरकारभार आणि कार्यालय बंद असण्याच्या तक्रारीवरून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजित मंडाले यांनी नवीन फेरचौकशी समिती गठीत करण्याचे आदेश दिले आहेत.
​ तक्रारदार गजानन बाबुराव कहाळे यांनी २२ जून रोजी THO कार्यालय बंद असल्याबाबत जीपीएस फोटो व व्हिडिओ पुराव्यासह तक्रार दाखल केली होती. मात्र, यापूर्वीच्या चौकशी अधिकाऱ्याने एकतर्फी अहवाल दिल्याने अहवाल मान्य नसल्या ने फेर चौकशी चा अर्ज देऊन तक्रारदाराने उपोषणाचा इशारा दिला होता. त्यामुळे दि. 09/10/2026 रोजी झालेल्या सुनावणीत तक्रारदाराने सादर केलेले लेखी जबाब पुरावे विचारात घेऊन (DHO)जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी तत्कालीन चौकशी अधिकाऱ्याचा पक्षपाती अहवाल फेटाळून लावल्या नंतर नवीन फेरचौकशीचे समिती स्थापन केल्या आदेश काढले. असून
​अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार, यांच्या अध्यक्षतेखाली ३ सदस्यीय समिती गठित केली आहे. या समितीत कनिष्ठ प्रशासन अधिकारी आर. एच. चव्हाण आणि कनिष्ठ सहाय्यक एन. डी. काळे यांचा समावेश आहे. या समितीला ७ दिवसांत सिंदखेड राजा येथे प्रत्यक्ष भेट देऊन सखोल चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यातआले असल्या ने या फेरचौकशीमुळे दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर काय कारवाई होते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आसून तालुका आरोग्य कार्यालयातील कर्मचाऱ्यांन मध्ये खळबळ उडाली आहे
​

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *