पेपरफुटीच्या कथित प्रकारांची निष्पक्ष चौकशी करण्याची राष्ट्रपतींकडे मागणी, एसडीओंमार्फत निवेदन

*एमपीएससीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह ; युवक काँग्रेसचे अकोटमध्ये आंदोलन पेपरफुटीच्या कथित प्रकारांची निष्पक्ष चौकशी करण्याची राष्ट्रपतींकडे मागणी, एसडीओंमार्फत निवेदन

अकोट शहर प्रतिनिधी भरतराज मर्दाने :

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षाप्रक्रियेतील कथित अनियमितता आणि पेपरफुटीप्रकरणी निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी अकोट येथे युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद नितोने यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन सादर करण्यात आले. महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी एमपीएससीच्या माध्यमातून शासकीय सेवेत दाखल होण्याचे स्वप्न पाहतात. मात्र, परीक्षाप्रक्रियेतील कथित गैरप्रकार आणि पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून, आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज दादा मोरे हे पुण्यात विविध मागण्यांसाठी आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या आंदोलनाला आणि विद्यार्थ्यांच्या न्यायाच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी अकोटमध्ये हे आंदोलन करण्यात आले. यावेळी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या अटकेचाही निषेध करण्यात आला.*निवेदनातील प्रमुख मागण्या* एमपीएससीमधील कथित पेपरफुटी आणि परीक्षाप्रक्रियेतील अनियमिततेची सखोल व निष्पक्ष चौकशी करावी, आयोगाच्या अध्यक्षांच्या कार्यकाळातील परीक्षा प्रक्रिया, निर्णय आणि प्रशासकीय कामकाजाची तपासणी करावी, अध्यक्षांविरोधात संविधानाच्या कलम ३१७ अन्वये आवश्यक घटनात्मक कारवाई करावी, गैरप्रकारांमुळे प्रभावित विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी परीक्षाप्रक्रियेत ठोस सुधारणा कराव्यात, अशा मागण्या करण्यात आल्या. चौकशीत दोषी आढळणाऱ्या व्यक्ती, अधिकारी आणि संबंधित घटकांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली.*काँग्रेस पदाधिकाऱ्यांची उपस्थिती*महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश महासचिव तथा अकोट विधानसभा पक्षनेते अधिवक्ता महेश गणगणे यांच्या निर्देशानुसार, तसेच महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव व अकोला जिल्हा प्रभारी उत्कर्ष देशमुख आणि प्रदेश महासचिव अभिलाष तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले.यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव प्रशांत पाचडे, नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष अफजल खान, जिल्हा उपाध्यक्ष सारंग मलानी, माजी नगरसेवक कालू मेंबर, नगरसेवक अजहर शेख, शेख ख्वाजा, बादल अहिर, अचल बेलसरे, जिल्हा सरचिटणीस निनाद मानकर, जिल्हा उपाध्यक्ष सारंग मलानी, अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीचे कोषाध्यक्ष डॉ. प्रमोद चोरे, संजय आठवले, विकास देशमुख, मुकुंद पांडे, विशाल भगत आदी उपस्थित होते. तसेच युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रोशन चिंचोलकर, विधानसभा अध्यक्ष निलेश आग्रे, अल्पसंख्याक शहराध्यक्ष नुसरत अली यांच्यासह शिवराम डिक्कर, साजिद खान, पंकज ठाकरे, महेंद्र पवार, अर्पित बोरोडे, शंकर मानकर, अथर हुसेन, अल्ताफ हुसेन, आनंद तेलगोटे, नितीन तेलगोटे, रमजान शाह, हसन शहा, धनराज कहार, अनिल फुलंबरकर, राजू ढोले, अशोक सदाफळे, परवेज अली, अंकुश तराळे, वाजिद अली, शाहिद अली, विश्वजीत केदार, शाकीर भाई, अभिषेक गणगणे, विवेक गणोरकर, मो. अझहर शेख, शोएब अली, इरफान खान, राहुल वाकोडे, विजय वानखडे, विकास वानखडे, बाळू भास्कर, आशिष वानखडे, मयूर लहाने, नागेश तेलगोटे, विशाल तेलगोटे, हिरालाल कासदेकर, निखिल झाडे, जयेश राजदे, चेतन मोहेकर, मोहम्मद युनुस, मोहम्मद शौकात, मिलिंद चिखले, तकदीर खान, कैफ अली, तौफिक हुसेन, सय्यद जमीर आणि निखिल वानखडे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *