
शालेय जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत होली क्रॉस कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांचे यश,विभागीय स्पर्धेसाठी निवड
अकोला जिल्हा प्रतिनिधी देवानंद खिरकर
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित जिल्हास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत १७ वर्षांखालील (अंडर-१७) मुलांच्या गटात होली क्रॉस कॉन्व्हेंट स्कूलच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद पटकावले आहे.या चमकदार यशासह त्यांची आगामी विभागीय स्तरावरील बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड झाली आहे. इयत्ता १० वी मध्ये शिकणारे स्वानंद सोनवणे,अमोघ रायपुरे,अनीश रायपुरे,ईशान साहू आणि अर्पित डोडिया यांनी संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट खेळ दाखवत विजय संपादन केला.या सर्व खेळाडूंना बॅडमिंटन प्रशिक्षक श्री शेखर दिवरे,श्री दीपक धुळे,श्री निशांत दिवरे यांचे उत्कृष्ट व मोलाचे मार्गदर्शन लाभले.खेळाडूंनी आपल्या या यशाचे श्रेय आपले आई-वडील,मार्गदर्शक प्रशिक्षक आणि शाळेतील शिक्षकांच्या निरंतर पाठिंब्याला व मार्गदर्शनाला दिले आहे.विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेचे प्राचार्य,क्रीडा शिक्षक,मार्गदर्शक प्रशिक्षक, शिक्षकवृंद व पालकांनी सर्व विजेत्या खेळाडूंचे कौतुक केले असून आगामी विभागीय स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
