ज्ञानेश्वर जाधव यांची अ. भा. कैकाडी महासंघाच्या विदर्भ अध्यक्षपदी नियुक्ती,

ज्ञानेश्वर जाधव यांची अ. भा. कैकाडी महासंघाच्या विदर्भ अध्यक्षपदी नियुक्ती,

वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)

दि,७ :-‌ अखिल भारतीय कैकाडी महासंघाच्या विदर्भ अध्यक्षपदी ज्ञानेश्वर जाधव ( वाशीम) यांची महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजयजी मेडे, (छत्रपती संभाजीनगर) यांनी नियुक्तीपत्र देऊन निवड केली असून, सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपाचे पदाधिकारी ज्ञानेश्वर जाधव यांचे सामाजिक कार्यची दखल घेऊन त्यांची निवड विदर्भ अध्यक्षपदी व्हावी म्हणून त्यांची शिफारस समाजाच्या वरिष्ठ पदाधिकारी व नेत्याकडे महासंघाचे राज्य सरचिटणीस किसनराव जाधव, (छत्रपती संभाजी नगर)महिला राज्य उपाध्यक्षा सौ उषा जाधव,(वाशीम) राज्य उपाध्यक्ष अनिल जाधव (कारंजा) माणिक जाधव जिल्हाध्यक्ष बुलढाणा, ज्ञानेश्वर गायकवाड, रवी जाधव अकोला, कमलबाई जाधव अमानी, यांच्यासह आदी समाज बांधवांनी केली होती, ज्ञानेश्वर जाधव आपण विदर्भामध्ये समाज व्यापक संघटन उभे करून समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचार विरोधात समाजाला न्याय द्याल अशी अपेक्षा राज्य कार्यकारिणीला आपणाकडून आहे, दिगंबर जाधव राज्य कार्याध्यक्ष अखिल भारतीय कैकाडी महासंघ, तसेच महासंघाचे सर्व उपनेते सर्व राज्य सरचिटणीस सर्व सचिव सहसचिव सर्व उपाध्यक्ष तसेच मार्गदर्शक तथा सल्लागार यांच्यावतीने अभिनंदन करण्यात आले,ज्ञानेश्वर जाधव हे वाशिम जिल्हा मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष होते त्यांच्या या निवडीबद्दल वाशिम जिल्ह्यासह सर्वत्र कैकाडी समाजा मध्ये कौतुक व अभिनंदन होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *