
सेंट पॉल्स अकॅडमी मध्ये महात्मा गांधी जयंती आणि लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी
अकोला जिल्हा प्रतिनिधी देवानंद खिरकर
स्थानिक श्रीजी कॉलनी स्थित सेंटपॉल्स अकॅडमी येथे महात्मा गांधी जयंती आणि भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष नवनीत लखोटिया आणि उपाध्यक्ष लूणकरन डागा, सचिव प्रमोद चांडक,दीपम लखोटिया,शारदा लखोटिया,सुधा डागा,रेखा चांडक,अवनी लखोटिया तसेच शाळेचे मुख्याध्यापक विजय बिहाडे उपमुख्याध्यापिका ममता श्रावगी,,रिंकू अग्रवाल,पर्यवेक्षक नितीन गावंडे,मालती महाले,सुचिता गायकवाड,वैशाली गावत्रे, प्रभूदास नाथे यांची मंचावर उपस्थिती होती.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून झाली.यावेळी वेदांश सुलेखिया यांनी महात्मा गांधी यांची तर निर्भय लोणकर यांनी लालबहादूर शास्त्री यांची व्यक्तिरेखा प्रभावीपणे साकारली.कार्यक्रमात इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जीवन कार्यावर भाषणे सादर केली.यामध्ये अहिल जुल्फी,वेदिका ढगे,देवांश ठाकूर,विदीप्ता पायघन,लक्ष्मी गावंडे,युवराज बोरकुटे यांचा सहभाग आहे.तसेच इयत्ता सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.विद्यार्थ्यांची ए बी सी डी अशा चार गटांमध्ये विभागणी करण्यात आली.या स्पर्धेत ए गट विजेता ठरला.विजेत्या गटात जान्हवी म्हैसने,सृष्टी राऊत,कृष्णाली थोरात,ईश्वरी ठाकरे,डिंपल तोंढवाल, विराई सपकाळ यांचा समावेश होता कार्यक्रमाच्या शेवटी विजय बिहाडे सरांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून महात्मा गांधी यांनी सत्य आणि अहिंसेचा मार्ग स्वीकारून देशाला नवी दिशा दिली तर लालबहादूर शास्त्री यांनी साधेपणा शिस्त आणि कर्तव्यनिष्ठेचा आदर्श समाजासमोर ठेवला असे सांगितले त्यांच्या विचारापासून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेऊन आपल्या जीवनात सत्य, प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठा अंगीकारावी असे आवाहनही त्यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरज जाखडे,उर्जित अवानकर आणि गार्गी वाघ यांनी केले तर आभार प्रदर्शन भक्ती सदार आणि ज्योती गवई यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
