
संतांच्या सानिध्यात राहिल्याने जीवनाचा उद्धार निश्चित – ह.भ.प. दत्ता महाराज अहिर यांचे प्रतिपादन
नांदुरा : (संदेश पहुरकर)
संतांच्या सानिध्यात राहिल्याने मनुष्याच्या जीवनाला योग्य दिशा मिळते आणि त्याचा आध्यात्मिक उद्धार झाल्याशिवाय राहत नाही, असे प्रतिपादन ह.भ.प. दत्ता महाराज अहिर यांनी केले.ते पुढे म्हणाले की, “आपण जगद्गुरू संत जंगली महाराजांच्या सानिध्यात आहोत. त्यांच्या कृपाछायेत राहणाऱ्या प्रत्येक भक्ताचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही,” अशी श्रद्धा व्यक्त केली.संतांचे विचार, त्यांचे आचरण आणि त्यांनी दाखविलेला भक्तीचा मार्ग आत्मसात केल्यास जीवनात सकारात्मक परिवर्तन घडते. संतांच्या शिकवणुकीतून समाजाला सदाचार, भक्ती, सेवा आणि मानवतेचा संदेश मिळतो. त्यामुळे प्रत्येकाने संतांच्या विचारांचा अंगीकार करून आपले जीवन समृद्ध करण्याचा प्रयत्न करावा, असे मार्गदर्शन ह.भ.प. दत्ता महाराज अहिर यांनी केले.
