
सिंदखेड राजा THO यांच्या गैरकारभाराची फेरचौकशी करा; अन्यथा जि. प. CEO कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून (DHO) संशयीतांना पाठीशी घालण्याचा तक्रारदारांचा आरोप; १२ ऑक्टोबरपासून आंदोलनाचा इशारा
तालुका प्रतिनिधी
सिंदखेड राजा येथील तालुका आरोग्य अधिकारी (THO) कार्यालयातील गैरकारभार आणि यापूर्वीच्या चौकशी अधिकाऱ्याने सादर केलेला खोटा व पक्षपाती अहवाल, याविरोधात वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. तसेच जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडूनही (DHO) या प्रकरणात चालढकल करून संबंधितांना पाठीशी घातले जात असल्याचा गंभीर आरोप करत तक्रारदारांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. येत्या १२ ऑक्टोबर २०२६ पासून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) यांच्या कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. नेमके काय आहे प्रकरण?सिंदखेड राजा तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील गैरकारभार, कर्मचाऱ्यांची अरेरावी आणि कार्यालयीन वेळेत कार्यालय बंद असणे यांबाबत तक्रारदार गजानन बाबुराव कहाळे यांनी १५ सप्टेंबर २०२६ रोजी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे अपील अर्ज दाखल केला होता. यापूर्वीच्या चौकशी अधिकाऱ्याने जीपीएस पुरावे (GPS Photos) व प्रत्यक्ष वस्तूस्थितीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून व आर्थिक देवाण घेवाण घेवाण झाले असल्याचे शक्यता नाकरता येत नाही दोषींना वाचवण्यासाठी बनावट अहवाल चुकीचा स्वयंस्पष्ट अहवाल तयार केल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. या अयोग्य अहवालावर १५ दिवसांत फेरचौकशी व कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा देण्यात आला होता. परंतु, मुदत संपूनही प्रशासनाकडून कोणतीही दखल न घेण्यात आल्याने अखेर तक्रारदारांनी उपोषणाचा मार्ग निवडला आहे. तक्रारदारांच्या प्रमुख मागण्या:तात्कालीन चौकशी अधिकाऱ्याचा खोटा व पक्षपाती अहवाल त्वरित रद्द करण्यात यावा. दुसऱ्या सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी (ADHO) मार्फत या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व सखोल फेरचौकशी व्हावी. दोषी आढळणाऱ्या तालुका आरोग्य अधिकारी व संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची आणि निलंबनाची कडक कारवाई करण्यात यावी. जीवास काही बरे-वाईट झाल्यास प्रशासन जबाबदार!”वारंवार पुराव्यांसह तक्रारी देऊनही जिल्हा आरोग्य अधिकारी (DHO) कार्यालय आणि प्रशासन संबंधित अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. प्रशासनाच्या या उदासीन धोरणामुळे आमच्यावर अन्याय होत असून, १२ ऑक्टोबरपासून तक्रारदार गजानन कहाळे,बबन हरिभाऊ सरकटे, दिपक म्हस्के आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणास बसत आहोत. उपोषणादरम्यान आमच्या आरोग्यास किंवा जीवास काही बरे-वाईट झाल्यास त्याची संपूर्ण प्रशासकीय व कायदेशीर जबाबदारी दोषी अधिकारी व प्रशासनावर राहील,” असा इशारा तक्रारदारांनी दिला आहे. या निवेदनाच्या प्रती राज्याचे आरोग्यमंत्री, बुलढाणा जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, आरोग्य सेवा आयुक्त, लोकायुक्त आणि अकोला विभागाचे उपसंचालक यांनाही माहिती व पुढील कारवाईसाठी पाठवण्यात आल्या आहेत.
