
अकोट नगर परिषदेच्या वतीने स्वच्छता ही सेवा अभियान
अकोला जिल्हा प्रतिनिधी देवानंद खिरकर
अकोट नगरपरिषदेच्या वतीने ‘स्वच्छता ही सेवा अभियान २०२६’ अंतर्गत सफाई मित्रांच्या आरोग्य व सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी सफाई मित्र सुरक्षा शिबिर, आरोग्य तपासणी तसेच PPE/Safety Kit वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांतर्गत नगरपरिषदेमध्ये कार्यरत सफाई मित्रांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच स्वच्छता कामकाजादरम्यान आवश्यक असलेले PPE (Personal Protective Equipment) व Safety Kit सफाई मित्रांना वितरित करण्यात आले. यावेळी सफाई मित्रांना स्वच्छता कामकाज करताना सुरक्षा साधनांचा योग्य वापर, वैयक्तिक स्वच्छता, आरोग्याची काळजी आणि सुरक्षित कार्यपद्धती याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सदर कार्यक्रमात मुख्याधिकारी श्री. शशिकांत मारोती बाबर, स्वच्छता विभाग प्रमुख श्री. आकाश आहेर व स्वच्छता निरीक्षक श्री. अक्षय फडतरे यांनी सफाई मित्रांना मार्गदर्शन केले. सफाई मित्रांनी सुरक्षिततेच्या साधनांचा नियमित व योग्य वापर करून स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.सफाई मित्र हे शहराच्या स्वच्छतेमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असून, त्यांच्या आरोग्याची व सुरक्षिततेची काळजी घेणे ही नगरपरिषदेची महत्त्वाची जबाबदारी आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून सफाई मित्रांना सुरक्षित कार्यपद्धतीबाबत मार्गदर्शन तसेच आवश्यक सुरक्षा साधने उपलब्ध करून देण्यात आली.”सफाई मित्र सुरक्षित तर शहर स्वच्छ व निरोगी!”
