शिवाजी बकाल यांच्या मरणोत्तर नेत्रदानातून माणुसकीचा प्रकाश

शिवाजी बकाल यांच्या मरणोत्तर नेत्रदानातून माणुसकीचा प्रकाश

वाशिम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)

दि. २७ सप्टेंबर (जिमाका) : जिवलग व्यक्तीच्या निधनानंतर दुःखावर मात करत शिवाजी बकाल यांच्या कुटुंबीयांनी मरणोत्तर नेत्रदानाचा प्रेरणादायी निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे गरजू व्यक्तींच्या आयुष्यात दृष्टीचा प्रकाश निर्माण होण्याची आशा निर्माण झाली आहे.जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल कावरखे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अविनाश पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली नेत्रशल्यचिकित्सक व नेत्रदान पथकाने मरणोत्तर नेत्रबुबुळे काढून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला येथे पाठविली. नेत्रदान समुपदेशक रमेश ठाकरे व नेत्रचिकित्सा अधिकारी सुधीर साळवे यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली.दुःखाच्या प्रसंगी सामाजिक बांधिलकी जपत बकाल कुटुंबीयांनी घेतलेला हा निर्णय समाजासाठी प्रेरणादायी आहे. नेत्रदान चळवळ लोकचळवळ व्हावी आणि मृत्यूनंतर जवळच्या व्यक्तीचे वेळेत नेत्रदान घडवून आणावे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल कावरखे यांनी केले असून, त्यांनी बकाल कुटुंबीयांचे आभार असून
नेत्रदानासाठी ९९२२५१९९४८ (जिल्हा रुग्णालय, वाशिम यांच्याशी संपर्क साधावा.असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *