गणेश विसर्जन मिरवणुकीत वाद; माजी उपसभापतींचा बकाल यांचा मृत्यू ग्राम तिवळी येथील घटना

गणेश विसर्जन मिरवणुकीत वाद; माजी उपसभापतींचा बकाल यांचा मृत्यू ग्राम तिवळी येथील घटना

वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)

शिरपूर येथूनच जवळ असलेल्या ग्राम तिवळी येथे दोन गणेश मंडळांमध्ये मिरवणूक मागे पुढे नेण्याच्या वादावरून दोन मंडळाच्या मध्ये शाब्दिक वाद धक्काबुक्की झाली आहे यामध्ये माजी सभापती शिवाजी बकाल यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे यामुळे शेकडो नातेवाईक यांच्यासह गणेश भक्त यांनी पोलीस ठाण्यासमोर रात्रभर ठिय्या आंदोलन केले आहे या बंदोबस्तासाठी वाशिम जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन चे कर्मचारी पोलीस निरीक्षक उप पोलीस विभागीय अधिकारी रामकृष्ण पवार अप्पर पोलीस अधीक्षक लता फड रात्रभर शिरपूर व तिवळी येथे बंदोबस्तसाठी तैनात होते
ग्राम तिवळी येथे गणेश मंडळांना गणपतीची विसर्जन मिरवणूक काढण्यात बंदी आहे तरी देखील तेथील चार गणेश मंडळांनी जबरदस्ती मिरवणूक काढली परंतु या मिरवणुकीमध्ये पहिलेच असलेले दोन गटांमध्ये वाद हे यावेळेस उफळून आले.यामध्ये गणपती विसर्जन मिरवणूकी मध्ये मंडळ एक नंबर वर ठेवण्यासाठी जगदंब गणेश मंडळ यांनी पुढे नेण्याच्या कारणावरून दोन गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादानंतर धक्काबुक्कीची घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटने मध्ये मा. उपसभापती शिवाजी जनार्दन बकाल (वय वर्षे ५५, रा. तिवळी, ता. मालेगाव) यांचा यामध्ये मृत्यू झाल्याची घटना घडली आहे अशी फिर्याद दीपक शिवाजी बकाल यांनी शिरपूर पोलीस स्टेशनला दिली आहे.ही घटना दि. २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे . घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील सर्व पोलीस दल शिरपूर येथे बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते माजी पंचायत समिती उपसभापती शिवाजी बकाल यांच्या मृत्यूची माहिती मिळताच शेकडो गणेशभक्त, मंडळांचे कार्यकर्ते व नातेवाईक शिरपूर पोलीस ठाण्यासमोर जमा झाले. संबंधित घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी करत नागरिकांनी बसस्थानक ते वाघी रोडदरम्यान पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन केले. यामुळे काही काळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. पोलिसांनी पर्यायी मार्गाने वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला.दरम्यान, मृतदेह नातेवाईक व मंडळातील कार्यकर्त्यांनी शिरपूर पोलीस ठाण्याच्या आवारात आणला होता. संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.दरम्यान, गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान वापरण्यात आलेली चार बँड पथकाचे वाहने पोलिसांनी ताब्यात घेऊन शिरपूर पोलीस ठाण्यात जमा कली आहेत या चार गणेश मंडळावर शिरपूर पोलिसांनी कारवाई केल्याचे समजते या घटनेप्रकरणी नेमका वाद कशामुळे झाला, धक्काबुक्कीमध्ये कोण कोण सहभागी होते फिर्यादीच्या तक्रारीवरून यानुसार आरोपी 15 ते 20 जनावर कारवाई करण्यात आली आहे तसेच शिवाजी बकाल यांच्या मृत्यूचे वैद्यकीय कारण याबाबत अधिकृत तपास व वैद्यकीय अहवालानंतरच स्पष्टता होणार आहे. या घटनेचा तपास उप पोलीस विभागीय अधिकारी रामकृष्ण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर पोलीस ठाणेदार योगिता भारद्वाज ह्या करीत आहेत. शिवाजी बकाल यांचा पोलीस बंदोबस्तामध्ये ग्राम तिवळी येथे हजारो लोकांच्या उपस्थितीमध्ये धोकाकुल वातावरणात अंत्यविधी करण्यात आला आहे यामुळे तिवळी या गावावर शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *