अहिल्याबाई होळकर योजनेत कर्ज माफ झाले मात्र कर्ज मिळण्यात अडचणी प्रश्न मार्गी लावा

अहिल्याबाई होळकर योजनेत कर्ज माफ झाले मात्र कर्ज मिळण्यात अडचणी प्रश्न मार्गी लावा

तालुका प्रतिनिधी चंद्रपूर

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चंद्रपूरचे शेतकऱ्यांना आर्थिक उभारी देण्यामध्ये 70 % टक्के वाटा आहे विविध कार्यकारी सहकारी संस्था आदिवासी सहकारी संस्था यांच्या माध्यमातून हजारो शेतकऱ्यांना पीक कर्ज मोठ्या प्रमाणात व शेतकऱ्यांना वेळेवर देण्याची नेहमी आघाडी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने घेतली आहे नुकत्याच 20 26 -27 मध्ये शासनाने कर्जमाफी योजना घोषित करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला मात्र तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांच्या पदरात यावर्षी खरीप हंगामात संकट आल्याने सोयाबीन व कापूस पिकाला मोठा फटका बसला आहे रब्बीच्या पूर्वतयारीसाठी शेतकऱ्यांना कर्जाची नीतंत गरज असताना जिल्हा परिषदेच्या कर्ज वितरण नियमन समितीने कर्ज वितरण करण्याचे निकष लावून दिले. मात्र 26 27 चे ऑनलाईन पेरा अनेक शेतकऱ्यांच्या सातबारावर नोंदच झालेल्या नाही तर अनेक दिवसापासून साईट बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना पीक पेरणीनंतर नोंदी करणे तांत्रिक माहितीअडचणी येत असल्याने2026 27 चे नोंदणी झालेले नाही बँकेने कर्ज माफ झालेल्या शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी अडचणी नाही मात्र पिक पेऱ्याच्या नोंदी झाले नसल्यामुळेखरीप हंगामातील कर्जवाटप विलंब होत आहे यापूर्वी देखील बँकेने युती तालुक्यासारख्या ऑफलाइन सातबारावर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा केला आहे मात्र ऐन रब्बीच्या हंगामाच्या तोंडावर पेऱ्याची अट असल्यामुळे शेतकरी पुढचा अडचणीत आलेला आहे याबाबत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रविन्द्र शिंदेस्वतः पुढाकार घेत आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार आमदार कीर्ती कुमार भांगडिया व जिल्हाधिकारी यांना कर्ज वितरणाबाबत तांत्रिक अडचण दूर करून सातबारावर पीक पेऱ्याच्या ऑफलाइन किंवा हस्तलिखित नोंदी करून दिल्यास बँकेकडून कर्ज वितरणाला विलंब होणार नाही व शेतकऱ्यांसाठी युद्ध पातळीवर कर्जवाटप करू असे सांगितले मात्र तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांमध्ये वेळेवर कर्ज मिळत नसल्याने सर्वत्र नाराजीचा सूर आहे याबाबत लोकप्रतिनिधी व प्रशासनाने कर्ज वितरणातील अडचण दूर करून तातडीने विशेषता ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची भिस्त कर्जावरच अवलंबून असल्यामुळे कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी उपाययोजना करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सहसचिव आबिद अली यांनी बँकेचे अध्यक्ष श्री रवी शिंदे व जिल्हाधिकारी यांना पाठवलेल्या निवेदनात केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *