
दिव्यांग संघटने कडून जिल्हाधिकारी साहेब यांना एका निवेदनाद्वारे मागणी.दिव्यांग बांधवांचे मागील ६ ते ८ महिन्यांपासून प्रलंबित मानधन तातडीने अदा करण्यात यावे.
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरंगे
बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील अनेक दिव्यांग बांधवांना शासनामार्फत मिळणारे मानधन मागील ६ ते ८ महिन्यांपासून मिळालेले नाही. मानधन मिळावे यासाठी संबंधित दिव्यांग लाभार्थ्यांनी तहसील कार्यालयात वारंवार चकरा मारून पाठपुरावा केला असून, निवेदनेही देण्यात आली आहेत. मात्र अद्यापही मानधन प्रलंबित आहे. दिव्यांग बांधवांसाठी मिळणारे मानधन हे त्यांच्या दैनंदिन गरजा व आवश्यक खर्चासाठी महत्त्वाचे आहे. अनेक महिन्यांपासून मानधन न मिळाल्याने लाभार्थ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तरी सदर प्रकरणाची तातडीने दखल घेऊन मागील ६ ते ८ महिन्यांचे प्रलंबित मानधन लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावे. तसेच मानधन प्रलंबित राहण्याचे कारण स्पष्ट करून पुढील काळात मानधन नियमित मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात यावी, ही विनंती. दिव्यांग बांधवांच्या या गंभीर प्रश्नाकडे सहानुभूतीपूर्वक व तातडीने लक्ष देऊन न्याय द्यावा अशी दिव्यांग बांधवांकडून मागणी होत आहे त्यावेळी सर्व दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी व तसेच दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
