
राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिनानिमित्त श्रमदान व नशामुक्ती शपथ कार्यक्रम
देवानंद खिरकर अकोला जिल्हा प्रतिनिधी
श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोट येथे राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एस.पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रमुख डॉ. भरत नागरे यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालय परिसरात भव्य श्रमदान व स्वच्छता अभियान राबविण्यात आले.या श्रमदानामध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत महाविद्यालयाचा संपूर्ण परिसर स्वच्छ केला.परिसरातील कचरा, प्लास्टिक व अनावश्यक गवत-झुडपे हटवून स्वच्छ व सुंदर परिसर निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. या उपक्रमातून स्वयंसेवकांनी “स्वच्छ परिसर, सुंदर परिसर” तसेच स्वच्छतेचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचविण्याचा संदेश दिला.याच कार्यक्रमांतर्गत नशामुक्त अभियान राबविण्यात आले.यावेळी उपस्थितांनी नशेपासून दूर राहण्याची तसेच समाजामध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करण्याची नशामुक्तीची शपथ घेतली.कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.अशोक इंगळे,डॉ.संतोष कायदे,डॉ.संतोष पाटोळे, राष्ट्रीय सेवा योजना महिला कार्यक्रम अधिकारी डॉ.प्रतिभा पवित्रकार तसेच डॉ.एम.के.नन्नावरे यांची प्रमुख उपस्थिती होती. राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी उत्साहाने सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वी केला.राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिनानिमित्त आयोजित या उपक्रमातून स्वच्छता, सामाजिक बांधिलकी, व्यसनमुक्ती आणि राष्ट्रसेवेचा संदेश देण्यात आला.
