दहिहांडा पोलीस स्टेशनचे गणेश विसर्जन शांततेत व काळजीपूर्वक करण्याचे आवाहन

दहिहांडा पोलीस स्टेशनचे गणेश विसर्जन शांततेत व काळजीपूर्वक करण्याचे आवाहन

देवानंद खिरकर अकोला जिल्हा प्रतिनिधी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, दहिहांडा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सर्व गावांतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि घरगुती गणेश भक्तांना पोलीस प्रशासनाच्या वतीने गणेश विसर्जन शांततेत पार पाडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.सुरक्षित समाज हेच आमचे ध्येय‘ हे ब्रीदवाक्य समोर ठेवून दहिहांडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोपाल ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली विसर्जन सोहळ्यासाठी चोख नियोजन करण्यात आले आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष सूचना जारी करण्यात आल्या आहेत.पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलेले आवाहन व उपाययोजना या मध्ये पारंपरिक वाद्यांचा वापर करा, ‘डीजे’ला फाटा द्या पोलीस प्रशासनाच्या वतीने सर्व मंडळांना कायदे व सुव्यवस्थेचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. उत्सवा दरम्यान ‘डीजे’ (ध्वनीवर्धक) चा वापर पूर्णपणे टाळून पारंपरिक वाद्यांचा व संस्कृतीचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांनी केले. तसेच
सर्व सार्वजनिक मंडळे आणि घरगुती गणपतींचे विसर्जन शांततेच्या वातावरणात करावे. विसर्जन घाटावर काळजीपूर्वक गणेश विसर्जन करून पोलीस प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे.
भाविकांच्या सुरक्षिततेसाठी विसर्जन घाटावर आणि विविध महत्त्वाच्या ठिकाणी दहिहांडा पोलीस स्टेशनतर्फे चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.पोलीस प्रशासनाने सर्व नागरिकांना गणेशोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या असून, विसर्जन सोहळा निर्विघ्न आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी नागरिकांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *