
पीककर्ज माफी, दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी तातडीने उपाययोजना करणार – मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस शेतकऱ्यांसह गुराढोराच्या चारापाण्याचेही नियोजन करणार-पिकांचे सरसकट नुकसान, मदतही सरसकट कोरड्या दुष्काळाचा जीआर उद्या निघणार; पीकविम्याचे पैसे देणार – मुख्यमंत्री
वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)
जिल्ह्यात पावसाअभावी निर्माण झालेल्या दुष्काळ परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वाशिम जिल्ह्यातील कारंजा, मंगरूळपिर नंतर मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे येथे भेट देऊन नुकसानग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी आणि शेतीच्या नुकसानीची माहिती जाणून घेतली. या संकटकाळात शेतकऱ्यांना एकटे न सोडता शासन पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभे राहून आवश्यक ती सर्व मदत करेल, यावेळी पिकांचे सरसकट नुकसान म्हणून मदतही सरसकट; अशी ग्वाही देत कोरड्या दुष्काळाचा जीआर उद्या निघणार; पीकविम्याचे पैसे देणार – मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा केली. शेतकऱ्यांशी संवादातून; पीक, पाणी आणि पशुधनाच्या समस्या जाणून घेतल्या, विम्याचे प्रश्न सोडवण्याचेही आश्वासन दिले. या दौऱ्यात शेतकऱ्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोरड्या दुष्काळाचा GR आणि वंचित शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा सरकार करेल असे सांगितले. राज्यात पावसाने दडी मारली मालेगाव तालुक्यातील अनेक गावातील सोयाबीनचे पिक हे पाण्याअभावी सुकले असून गेल्या ५० दिवसापासून या तालुक्यात पाऊसच पडला नाही त्यामुळे सोयाबीनचे पीक भरण्या आधीच करपून गेले. आज दी २४ सप्टेम्बर ला दुपारी दीड वाजता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी कारंजा मंगरूळपीर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतात जावुन पाहणी केली व त्यानंतर मुख्यमंञी देवेन्द्र फडणवीस यांचा ताफा शेलुबाजार, किन्हीराजा मार्गे दुपारी १ ४५ वाजता जऊळका रेल्वे षेथील शेतकरी संतोष सखाराम डुंबळे यांच्या शेतीच्या बांधावर जाऊन दुष्काळ परिस्थितीची पाहणी केली. उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शेतकरी संतोष यांच्या आई शकुंतला यांनीही दुष्काळी परिस्थितीची कैफीयत मांडली. यावेळी शेतकऱ्यांशी व पत्रकारांशी बोलतांना मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस म्हणाले की या वर्षी भयानक दुष्काळ पडला असून सर्व अटी शर्ती नियम बाजुला ठेवून संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत कशी करता येईल याकडे आपल पहीले लक्ष राहणार असून अशा दुष्काळी परिस्थिती गुराढोराच्या चाऱ्याचा व पाण्याचा ही प्रश्न गंभीर आहे भविष्यात पाणी व चाऱ्याची समस्या तातडीने सोडविणार असून लवकरच. दुष्काळ मदतीची घोषणा आपण करणार आहोत आधी शेतकऱ्यांना मदत देणार व नंतर ईतर बाबीची तपासणी करणार असल्याचे मतही यावेळी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी व्यक्त केले. आधीची शेतकऱ्यांना कर्ज माफी ची कामे वेगाने सुरू असून ४८ हजार कोटीची शेतीपंपाची वीजबिले ही माफ केली आहे. हे सरकार शेतकरांच्या हिताचे निर्णय घेणारा सरकार असून कितीही बिकट परिस्थिती येऊद्या त्यावर मात करण्यासाठी व शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकार हे सक्षम आहे. त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्यांनी खचून जावु नये आम्ही खंबीरपणे आपल्या पाठीशी उभे आहोत व लवकरच या दुष्काळी पकीस्तीवर मात करण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याची माहिती यावेळी मुखमंञी देवेन्द्र फडनवीस यांनी जऊळका येथे दिली. यावेळी त्यांचेसोबत खासदार अनुप धोत्रे, आमदार भावना गवळी,आमदार रणधीर सावरकर, माजी आमदार विजय जाधव,आ.अमित झनक,नकुल देशमुख,राजू पाटील राजे , नगराध्यक्ष ओम खुरसडे, महादेव ठाकरे, दिलीप जाधव, मुंडे, प्रदीप कुटे व संबंधित अधिकारी उपस्थित होते. तसेच झेड प्लस सुरक्षा सह अकोला वाशीम जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे अनेक नेते व भाजप, शिवसेना कार्यकर्ते व शेतकरी महसूल विभागाचे कर्मच्यारी पोलीस कर्मच्यारी व त्यांचा ताफा होता
