अमानी फीडर अंतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा लाईन सुरू ठेवावी.

अमानी फीडर अंतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा लाईन सुरू ठेवावी.साहय्यक अभियंता मिरगेसह, आ.भावनाताई गवळी यांच्या कडे मागणी,

वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)

दि,७:-मालेगाव तालुक्यातील अमानी उपकेंद्रांतर्गत असलेल्या शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा सुरळीत वीजपुरवठा करण्याबाबत लेखी निवेदनाद्वारे वाघळुद येथील शिवसेना कार्यकर्त्य शंकर वाझुळकर यांनी मागणी केली आहे सदर निवेदन मालेगाव चे साहय्यक अभियंता मिरगे महावितरण तसेच विधान परिषद आ.भावनाताई गवळी यांच्या कडे केली आहे तालुक्यातील अमानी उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या गावांमधील शेतशिवारात सध्या खरीप हंगामातील पिके उभी आहेत. मात्र, मागील महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने पिके पाण्याअभावी सुकण्याच्या मार्गावर असून शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. पावसाचा दीर्घ खंड पडल्यामुळे सोयाबीन, तूर, कापूस, हळद आदी पिकांना सिंचनाची नितांत आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी वीजपुरवठा करण्यात येत असल्याने पिकांना पाणी देताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच वीजपुरवठा सुरळीत नसल्यामुळे उपलब्ध वेळेतही सिंचन करणे शक्य होत नाही. परिणामी पिकांचे नुकसान होण्याची शक्यता वाढली असून शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे. त्यामुळे अमानी उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या शेतशिवारातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा नियमित, अखंडित व सुरळीत वीजपुरवठा करण्यात यावा. पावसाअभावी निर्माण झालेली गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन महावितरणने तातडीने योग्य ती कार्यवाही करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, ही नम्र विनंती. शेतकऱ्यांच्या पिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी दिवसा सुरळीत वीजपुरवठा न केल्यास नाईलाजास्तव शेतकऱ्यांच्या न्याय्य मागणीसाठी लोकशाही व सनदशीर मार्गाने आंदोलन करण्यात येईल, याची प्रशासनाने गांभीर्याने नोंद घ्यावी. आपण या मागणीची तातडीने दखल घेऊन सकारात्मक कार्यवाही करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शंकर वाझुळकर शेलगांव ओंकार गिर यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *