
कवडधारी भक्तांच्या स्वागतासाठी व फराळवाटपासाठी भाजप अकोट सज्ज: अकोला रोड नाक्यावर भव्य कार्यक्रमाचे आयोज
अकोट शहर व तालुका प्रतिनिधी : शिवा मगर मो 9922833064
अकोट:भारतीय जनता पक्षाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्रावण महिन्याचे औचित्य साधून भव्य ‘कावड यात्रा महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार, दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ७:३० वाजता अकोला रोड नाका, अकोट येथे सर्व कवडधारी भक्तांचे भव्य स्वागत व अल्पोपहार (फराळ) वाटप करण्यात येणार आहे.या कार्यक्रमास अकोट मतदारसंघाचे आमदार श्री. प्रकाश पाटील भारसाकळे, अकोला लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री. अनुपजी धोत्रे, भाजप अकोला जिल्हाध्यक्ष श्री. संतोषजी शिवरकर यांच्यासह भाजप अकोला जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते विशेष संख्येने उपस्थित राहणार आहेत.भाविकांनी व नागरिकांनी या स्वागत सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भारतीय जनता पक्ष, अकोटच्या वतीने करण्यात आले आहे.🚩 जय भोलेनाथ! 🚩
