
शिवसेना कुटुंब संवाद बैठक उत्साहात संपन्न
वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)
दि,७:-मालेगाव येथे नगरपंचायत कार्यलयात ६ सप्टेंबर रोजीशिवसेना नेत्या तथा विधानपरिषद आमदार आदरणीय.भावना गवळी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मालेगाव येथे आयोजित करण्यात आलेली शिवसेना कुटुंब संवाद बैठक नउत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.या बैठकीमध्ये नगराध्यक्ष ओम खुरसडे सह मालेगाव तालुक्यातील आजी-माजी पदाधिकारी, युवा सैनिक, महिला आघाडीच्या पदाधिकारी तसेच असंख्य शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कुटुंब संवाद बैठकीत उपस्थित नागरिकांच्या विविध समस्या व अडचणी जाणून घेण्यात आल्या. नागरिकांनी आपल्या परिसरातील तसेच वैयक्तिक स्वरूपाच्या समस्या मांडल्या. त्यावर संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून संबंधित समस्यांवर आवश्यक कार्यवाही करून अनेक नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला.व काही समस्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात आली, तसेच काही समस्यांचे जागेवरच निराकरण करण्यात आले.यावेळी शिवसेना संघटना तळागाळापर्यंत अधिक मजबूत करण्याचा निर्धार करण्यात आला.शिवसेना पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य एकनाथरावजी शिंदे साहेब आणि युवानेते खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची विचारधारा घराघरात पोहोचवून संघटना अधिक बळकट करण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केलाचला एकत्र येऊया, शिवसेना अधिक मजबूत करूया असे आवाहन करण्यात आले
