आंतरमहाविद्यालयीन खो-खो स्पर्धेत स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगळे उद्यानविद्या महाविद्यालयास उपविजेतेपद

आंतरमहाविद्यालयीन खो-खो स्पर्धेत स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगळे उद्यानविद्या महाविद्यालयास उपविजेतेपद

जळगाव जामोद तालुका प्रतिनिधी सुरेंद्र गवई

डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालयाच्या वतीने दिनांक 11 ते 13 ऑगस्ट 2026 दरम्यान आंतरमहाविद्यालयीन पुरुष व महिला खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण 24 पुरुष व 23 महिला संघांनी सहभाग नोंदविला होता.खो-खो स्पर्धेत सातपुडा शिक्षण संस्था, जळगाव जामोद संचालित स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगळे कृषी महाविद्यालयाचा एक पुरुष व एक महिला संघ, स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगळे उद्यानविद्या महाविद्यालयाचा एक पुरुष व एक महिला संघ तसेच कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचा एक पुरुष संघ सहभागी झाला होता.स्पर्धेतील पुरुष संघांच्या अंतिम सामन्यात स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगळे उद्यानविद्या महाविद्यालय, जळगाव जामोद आणि कृषी महाविद्यालय, मुल यांच्यात अत्यंत चुरशीची लढत झाली. उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगळे उद्यानविद्या महाविद्यालयाच्या संघाने स्पर्धेत उपविजेतेपद पटकावून महाविद्यालयाचा नावलौकिक वाढविला.या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.कृष्णरावजी इंगळे, उपाध्यक्ष मा.श्री.हरिभाऊजी इंगळे, सचिव मा.श्री.शेषरावजी भोपळे, कोषाध्यक्षा डॉ.सौ.स्वातीताई वाकेकर, संचालक डॉ.संदीपजी वाकेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.नितीनजी सातव तसेच उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.योगेश गवई यांनी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट खेळकौशल्य, शिस्तबद्धता, संघभावना आणि अथक मेहनतीचे विशेष कौतुक केले.संघ व्यवस्थापक प्रा. निखिल भोपळे यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने ही उल्लेखनीय कामगिरी बजावली. या यशामुळे महाविद्यालयासह संपूर्ण संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *