जैन पर्युषण पर्वाची भक्तिमय सांगता अनंत चतुर्दशीला दहा दिवसीय पर्वाची समाप्ती

जैन पर्युषण पर्वाची भक्तिमय सांगता! – अनंत चतुर्दशीला दहा दिवसीय पर्वाची समाप्ती

वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)

शहरातील दिगंबर जैन मंदिरात जैन धर्मातील अत्यंत महत्त्वाचे दहा दिवसीय पर्युषण पर्व भक्तिमय व आनंदमय वातावरणात पार पडले अनंत चतुर्दशीच्या दिवशी या दहा दिवसांच्या पर्युषण पर्वाची विधिवत समाप्ती झाली. दहा दिवसांच्या कालावधीत जैन बांधवांनी उपासना,आराधना,तपश्चर्या,स्वाध्याय,संयम तसेच निर्जल उपवास करून धार्मिक साधना केली पर्युषण पर्वात उत्तम क्षमा,उत्तम मार्दव,उत्तम आर्जव,उत्तम शौच,उत्तम सत्य,उत्तम संयम,उत्तम तप,उत्तम त्याग,उत्तम आकिंचन्य आणि उत्तम ब्रह्मचर्य या दहा धर्मगुणांचे चिंतन करण्यात आले आत्मशुद्धी,संयम,सदाचार आणि क्षमाभावाचा संदेश या माध्यमातून देण्यात आला दहा दिवस मंदिरात सकाळी शास्त्रवाचन,अभिषेक,पूजन व विविध धार्मिक विधी उत्साहात पार पडले अभिषेकासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग नोंदविला सायंकाळी होणाऱ्या मंगल आरतीला भाविकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला महिला,पुरुष,युवक तसेच बालकांनीही धार्मिक कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला या कालावधीत अनेक भाविकांनी उपवास,निर्जल उपवास,एकासना,तपश्चर्या व विविध धार्मिक नियमांचे पालन केले दहा दिवसांच्या साधना-आराधनेमुळे मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते अनंत चतुर्दशीच्या दिवशी दहा दिवसीय पर्युषण पर्वाची सांगता होताना भाविकांनी धर्म,संयम व आत्मशुद्धीचा संदेश मनात रुजविला आनंदमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पर्युषण पर्वाची समाप्ती झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *