गौरी, गणेशोत्सवात पोषण महिना व सेवा संकल्प जागर अभियान- तालुक्यात विशेष उपक्रम

गौरी, गणेशोत्सवात पोषण महिना व सेवा संकल्प जागर अभियान- तालुक्यात विशेष उपक्रम

वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)

वाशिम व मालेगाव तालुक्यामध्ये 9 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर या कालावधीत 9 व्या राष्ट्रीय पोषण अभियानांतर्गत सप्टेंबर महिन्यात प्रत्येक दिवशी पोषण आहाराबाबत जनजागृतीपर जागर अभियानात विविध कार्यक्रम राबवले जात आहेत. तसेच 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत सेवा संकल्प अभियान राबविले जात आहे.या अनुषगाने वाशिम जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी बालकल्याण संजय गणविर यांच्या आदेशानुसार बालविकास प्रकल्प अधिकारी मदन नायक यांचे नेतृत्वात महिला व बालविकास विभागामार्फत अंगणवाडी केंद्रांमध्ये सेवा संकल्प अभियान व पोषण महिन्यानिमित्त सार्वजनिक गणेश मंडळ तसेच गौरी स्थापना झालेल्या ठिकाणी पर्यवेक्षिका व अंगणवाडी सेविकां मार्फत जनजागृती केली आहे. त्यामुळे प्रत्येक घटकापर्यंत पोषण अभियान पोचविण्याचे काम मालेगाव व वाशिम तालुक्यातील शिक्षण, आरोग्य, एम एस आर एल एस, महिला व बालकल्याण व इतर सर्व विभागामार्फत सुरू आहे. अशाच प्रकारे अभियान कालावधीत जनजागृती कार्यक्रम सुरू राहणार आहेत, पोषण अभियान यादरम्यान महिला व बालकांचे स्वास्थ्य, पारंपरिक आहार, गृहभेटी देणे, परसबाग तयार करणे, कुपोषित बालकांना भेटी देणे, माता माता समितीची सभा घेणे, मुलींच्या जन्माचे वृक्षारोपण करून स्वागत करणे, गर्भवती व स्तनदा महिलांना समुपदेशन करणे, किशोरी मुलींना आहार व आरोग्य विषयक माहिती देणे, तसेच सार्वजनिक ठिकाणी पोषण महिना निमित्त विविध कार्यक्रम घेऊन जनजागृती सुरू आहे. विशेषतः अंगणवाडी स्तरावर आहारातील विविधता,पोषण थाळी व पाककृती प्रदर्शन, ताजा गरम आहार व स्वच्छता दिन,समुदाय सहभाग ,माझी अंगणवाडी – माझी जबाबदारी, बाल विकासखेळणी, गोष्टी व बालगीतांचा दिवस, माता आरोग्य व PMMVY जनजागृती मेळावा इत्यादी पाच थीमवर विशेष भर असणार आहे. या करिता वाशिम व मालेगाव प्रकल्पातील पर्यवेक्षिका नंदा झळके, मिनाक्षी सुळे, सविता दराडे, नूतन धोटे, शशिकला गव्हाणे, अनिता भोयाळकर, विधाता कवटकर व सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस मार्फत अभियान कालावधीत अंगणवाडी स्तरावर कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *