
आपत्तीच्या काळी लोकप्रतिनिधी प्रशासन आपल्या दारी; जळगाव जामोदमध्ये रात्रीच्या अंधारात नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर..
जळगाव तालुका प्रतिनिधी सुरेंद्र गवई
जळगाव जामोद तालुक्यात ३० जुलै २०२६ रोजी रात्री झालेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक सखल भाग जलमय झाले. विशेषत जळगाव जामो शहरातील तलावपुरा व वायलीवेस परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता.
या आपत्कालीन परिस्थितीत जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे, तहसीलदार पवन पाटील, मलकापूर विभागाचे एसडीपीओ सोहन माचरे जळगाव जामोद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन बागुल,शेडगे मॅडम पो कॉ मोहाळे
धीरबस्सी , वेरूळकर,झाल्टे,रिंढे,राजपूत ,बोंद्रे नंदाने, सोळंके ,पाटोळे,
चाटे,खराटे ,सोनोनो
तसेच पोलीस प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी व स्थानिक नागरिक यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.
रात्रीच्या अंधारात नागरिक गाढ झोपेत असताना प्रशासनाने घराघरांत जाऊन त्यांना जागे केले, परिस्थितीची माहिती दिली आणि कोणतीही जीवितहानी होऊ नये म्हणून सुरक्षितस्थळी स्थलांतरित केले. अनेक ठिकाणी पाण्याचा वेग वाढलेला असतानाही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नागरिकांना मदत केली. त्यांच्या तत्परतेमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली.
बचावकार्यादरम्यान ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले आणि गरजू कुटुंबांना प्राधान्य देत सुरक्षितस्थळी पोहोचविण्यात आले. संपूर्ण कारवाईदरम्यान पोलीस, स्थानिक प्रशासन यांच्यात उत्कृष्ट समन्वय पाहायला मिळाला.
या धाडसी आणि तत्पर कामगिरीमुळे संकटाच्या काळात लोकप्रतिनिधी व प्रशासन नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा विश्वास अधिक दृढ झाला. “आपत्तीच्या काळी लोकप्रतिनिधी व प्रशासन आपल्या दारी” ही उक्ती जळगाव जामोदमध्ये प्रत्यक्षात अनुभवायला मिळाली. नागरिकांनीही पोलीस, स्थानिक प्रशासनाच्या या सेवाभावी कार्याचे मनापासून कौतुक केले.
