दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी प्रयत्न करा.डॉ.वैष्णवी खासबागे

दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी प्रयत्न करा.:- डॉ.वैष्णवी खासबागे.

वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)

ता.१९शहर आणि परिसरातील गोरगरीब लोकांना दर्जेदार आरोग्य सेवा पुरविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करा तसेच आरोग्य वर्धिनी केंद्रा मार्फत कोणत्या सुविधा मिळतात याची सखोल माहिती देवून, येथील माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत गेली पाहिजे यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन गाडगे बाबा नगर मधील आरोग्य वर्धिनी केंद्रात आयोजित आशा, आरोग्य सेवक व स्थानिक सदस्य यांच्याशी बोलताना तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वैष्णवी खासबागे यांनी सांगितले आहे. येथील गाडगे बाबा नगर मध्ये, आरोग्य वर्धिनी केंद्रात ता.१७ रोजी दुपारी १२ वा प्रमुख मार्गदर्शक म्हणून तालुका आरोग्य अधिकारी डॉ.वैष्णवी खासबागे, नगर सेवक संजराव बळी,केंद्रातील आरोग्य अधिकारी डॉ, मनिष बोरकर,़ प्रसिद्ध डॉ.रेणुका कापुरे,जेष्ठ नागरिक प्रा.पी.एस.खिराडे, पत्रकार भास्करराव गुडदे प्रमुख म्हणून उपस्थित होते. यावेळी डॉ वैष्णवी खासबागे यांनी या केंद्रा मार्फत कोणत्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात याची माहिती दिली. केंद्रा मार्फत आरोग्य सुविधा गरजू लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचे आवाहन केले. यावेळी आशा पुजा बळी, वैशाली मोहळे, अर्चना बळी, सोनटक्के यांनी ग्रामीण भागात महिलासाठी पुरवीत असलेल्या सुविधांची माहिती दिली. डॉ, रेणुका कापुरे,प्रा.खिराडे, भास्करराव गुडदे, यांनी काही आवश्यक सुविधा उपलब्ध देण्याची मागणी केली तसेच येथील रक्त तपासणीच्या अहवालात नेहमीच तफावत आढळून येते,याची दक्षता घेण्याची विनंती केली. प्रास्ताविक डॉ. मनिष बोरकर यांनी डॉ, सुरेन्द्र उखळे, यांनी संचालक व आभार प्रदर्शन केले.यावेळी सर्व कर्मचारी व सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *