पेट्रोल-डिझेल दरवाढ मागे घ्या.मनसेचा सरकारला इशारा

पेट्रोल-डिझेल दरवाढ मागे घ्या.मनसेचा सरकारला इशारा

वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)

गेल्या 11 दिवसांत पेट्रोल-डिझेलच्या दरात 8 रुपयांनी वाढ झाल्याने सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. या दरवाढीचा निषेध करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वाशिम जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन दरवाढ तात्काळ मागे घेण्याची मागणी केली आहे. जिल्हाध्यक्ष राजू किडसे यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 12 वर्षांत पेट्रोल 38 टक्के तर डिझेल 62 टक्क्यांनी महागले आहे. डॉ. मनमोहन सिंग यांच्या काळात कच्चे तेल 100 डॉलर प्रति बॅरल असतानाही पेट्रोल 72 रुपयांच्या वर गेले नाही. मात्र सध्या कच्चे तेल 50 ते 55 डॉलर असतानाही पेट्रोल 100 रुपयांच्या जवळ पोहोचले आहे. मनसेने केंद्र सरकारवर गंभीर आरोप करताना म्हटले की, 12 वर्षांत पेट्रोलियम उत्पादना वरील कर व शुल्कातून सरकारने जनतेच्या खिशातून 43 लाख कोटींचा नफा कमावला. मागील 4 दिवसांतील 4 रुपयांच्या दरवाढीमुळे भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल, हिंदुस्थान पेट्रोलियम या कंपन्यांनी काही तासांतच 12,400 कोटींची कमाई केली. ही नफेखोरी म्हणजे जनतेच्या खिशावर दरोडा असल्याचे मनसेने म्हटले.राज्यातील अनेक पेट्रोल पंप बंद असल्याने शेतकऱ्यांना डिझेल मिळत नाही. त्यामुळे ट्रॅक्टर बंद पडून शेतीची कामे खोळंबली आहेत. पेरणीचे दिवस तोंडावर आल्याने खताचा पुरवठाही सुरळीत करण्याची मागणी निवेदनात केली आहे.

वेळेत पेरणी न झाल्यास अन्नधान्य उत्पादन घटेल व पुन्हा महागाईचा भडका उडेल, असा इशारा मनसेने दिला.यासोबतच NEET परीक्षेतील गोंधळावर कठोर कारवाई करावी व कांद्याला हमीभाव द्यावा, अशी मागणीही करण्यात आली.मनसे जिल्हा अध्यक्ष राजू किडसे, जिल्हा सचिव लखन राठोड, उपशहर प्रमुख आकाश लोलप, अध्यक्ष गजानन इंगोले, उप जिल्हाध्यक्ष कारंजा मानोरा अमोल लुलेकर, प्रभारी शहराध्यक्ष कारंजा कपिल महाजन, मंगरूळपीर तालुका अध्यक्ष लक्ष्मण जाधव, वाशिम मंगरूळपीर उपजिल्हाध्यक्ष उमेश टोलमारे, विध्यार्थी मनसे जिल्हाध्यक्ष गजानन कढणे, विध्यार्थी मनसे उपजिल्हाध्यक्ष अनिकेत शेटे, तालुका अध्यक्ष कारंजा प्रभाकर बनारसे, मालेगाव तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर गवळी, मालेगाव रिसोड उपजिल्हाध्यक्ष अतिश ढहाळ, मानोरा तालुका अध्यक्ष संतोष घोडे, मालेगाव शहराध्यक्ष सुभाष गाभणे, मानोरा शहराध्यक्ष महादेव भस्मे, रिसोड तालुका अध्यक्ष योगेश वाळके, कृषी सेना जिल्हाध्यक्ष विठ्ठल राठोड, वाशिम तालुका अध्यक्ष विठ्ठल राठोड, रिसोड उप तालुकाध्यक्ष कराळे व कृषी सेना जिल्हा उपाध्यक्ष आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.जनतेला दिलासा देण्यासाठी पेट्रोल-डिझेलची दरवाढ मागे घेऊन पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *