
मानका येथे प्राणप्रतिष्ठा व कलशा रोहन, सोहळामहाप्रसादाचा व इतर कार्यक्रमाचा लाभ घ्यावा–सागर मगर
वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)
तालुक्यातील मानका येथे १३ मे रोजी “पुण्यश्लोक स्मृति, स्वप्न साकारण्याची हीच ती शुभ घडी”हा उद्देश ठेवून मगर परिवाराच्या वतीने वडिलांचे स्वप्न हीच आमची भक्ती या दृष्टिकोनातूनच, ते हयात असताना सांगितल्याप्रमाणे आमच्या शेतात भगवान महादेव व माता जगदंबा यांचे मंदिर बांधून, प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन, करण्याचे ठरवले असून, 13 मे रोजी, शेतात कीर्तनाचा कार्यक्रम तसेच पूजा आरती राम

प्रतिष्ठान कलर्स व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून या सर्व कार्यक्रमाचा लाभ परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने घ्यावे असे उच्चआवाहन मगर परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे, कै. बबनराव उर्फ श्रीरामजी मगर यांच्या पुण्यप्रतापामुळे आणि त्यांच्या पवित्र संकल्पतुन, शेतात महादेवाचे व जगदंबा मातेचे मंदिर बांधून या ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे या सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे मगर यांनी सांगितले
