जिजामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा उत्कृष्ट निकाल

जिजामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा उत्कृष्ट निकाल

जिल्हा प्रतिनिधी उमेश लहाने

जिजामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पांगरी नवघरे चा इयत्ता बारावी विज्ञान व कला शाखा तसेच इयत्ता दहावीचा दरवर्षी प्रमाणे या हि वर्षी उत्कृष्ट निकाल लागला आहे.बारावी विज्ञान शाखेचा 100 टक्के निकाल लागला आहे तसेच कला शाखेचा 98.33टक्के निकाल लागला असून इयत्ता दहावीचा 91टक्के निकाल लागला आहे. इयत्ता बारावी विज्ञान शाखेतून शुभम प्रभाकर आंधळे 79 टक्के गुण मिळवून प्रथम आला आहे तर स्नेहा शिवाजी लहाने 77 टक्के गुण मिळवून द्वितीय व श्रुती विजय वाझुळकर 76.83 टक्के गुण मिळवून तृतीय आली आहे तर कला शाखेतून स्वप्नील नंदू खंदारे 93.50 टक्के घेऊन प्रथम तर संस्कृती लक्ष्मण नवघरे 84.17 द्वितीय व आशुतोष मधुकर नवघरे 81.33 टक्के गुण मिळवून तृतीय आला आहे. तर इयत्ता दहावी मधून पूनम गणेश धाड 85.20 टक्के गुण मिळवून प्रथम तर सौरभ मधुकर नवघरे व साक्षी गजानन काकडे 83.60 टक्के गुण मिळवून द्वितीय आले आहेत. तर प्रवीण बबन कुंभार 80 टक्के गुण मिळवून तृतीय आला आहे.कला शाखेत प्राविण्य श्रेणी विद्यार्थी 8,प्रथम श्रेणी 25,द्वितीय श्रेणी 20,उत्तीर्ण श्रेणी 6 विद्यार्थी तर विज्ञान शाखेत प्राविण्य श्रेणी 3,प्रथम श्रेणी 82,द्वितीय श्रेणी 13 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर इयत्ता दहावीत प्राविण्य श्रेणीत 6,प्रथम श्रेणी 35,द्वितीय श्रेणी 35, पास श्रेणी 1विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.सर्व विद्यार्थ्यांचे व्यंकटेश सेवा समिती चे अध्यक्ष तथा माजी आमदार

विजयराव जाधव, सचिव रंगनाथ पांडे, संचालक सुनील जाधव, राम जाधव, अजिंक्य जाधव यांनी अभिनंदन केले आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांनी निवडीचे श्रेय आई वडील व प्राचार्य राधेश्याम घुगे, क्रीडाशिक्षक विलास खराटे , नवनाथ मुठाळ, प्रा. गोकुळ राठोड, प्रा. संतोष वाझुळकर, प्रा. पंकज ईश्वरे, प्रा. योगेश पवार, प्रा. बाळु राऊत, परमेश्वर वाळुकर, गणेश वाझुळकर , रामेश्वर मानवतकर, गणेश बाजड, रवी जंजाळकर, वैशाली धंदरे, उमेश लहाने,प्रसाद जाधव,अनंत जहागिरदार, संदीप देशमुख, बळीराम नवघरे, मोहन शिरसाट सर्व शिक्षकवृंद , कर्मचारीवृंद यांना दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *