बंजारा समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण समीतीचा अहवाल सादर करा.अन्यथा गोर सेना पुन्हा महाराष्ट्रात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा

बंजारा समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण समीतीचा अहवाल सादर करा.अन्यथा गोर सेना पुन्हा महाराष्ट्रात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा.

वाशीम जिल्हा प्रतिनिधी ( अनिल जाधव )

बंजारा बांधवांना एस टी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे ही मागणी बंजारा समाज बांधवा कडून व गोरे सेनेकडून तहसीलदार यांना निवेदन देवून करण्यात आली आहे. बंजारा समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी गोर सेनेचे प्रा. संदेश चव्हाण यांच्या आदेशा वरुन महाराष्ट्रात तब्बल ५८ महामार्गा सह मालेगांव तालुक्यात समृद्धी महामार्ग ही रोखून धरला होती. त्यानंतर मंत्रालयात या विषयावर सविस्तर चर्चा झाली व समिति गठित करण्यात आली डिसेंबर महिन्यात स्थापन झालेल्या समितीचा अभ्यासपुर्ण आराखडा बंजारा समाजासमोर आणावा अन्यथा त्याच ताकतीने आम्ही पुन्हा तीव्र आंदोलन करू अशा मागणी चे निवेदन आज गोरे सेनेचे मालेगाव तालुका अध्यक्ष अनिल जाधव, चंदन राठोड, अशोक पवार सह अनेक समाज

बांधवांच्या वतीने नायब तहसीलदार रंजना गोरे यांना देण्यात आले. महाराष्ट्रातील तमाम बंजारा बांधवांना एस टी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे ही मागणी बंजारा समाज बांधवाकडून व गोरे सेनेकडून मोठ्या ताकतीने लावुन धरली जात असून याच मागणीसाठी महाराष्ट्रात विविध ठिकाणी गोरे सेनेचे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *