कार्याची दखल घेत राज्यस्तरीय गौरव महाराष्ट्र साई पद्मश्री पुरस्कार सोहळा उत्साहात

कार्याची दखल घेत राज्यस्तरीय गौरव – महाराष्ट्र साई पद्मश्री पुरस्कार सोहळा उत्साहात

वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)

शिर्डी, येथे दि. 02 मे 2026 (प्रतिनिधी) –राज्यस्तरीय “महाराष्ट्र साई पद्मश्री 2026” पुरस्कार वितरण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. ओम साई विकास प्रतिष्ठान व बी.बी.सी. फिल्म प्रोडक्शन, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.समाजसेवा, वैद्यकीय, सहकार व शेती क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या मान्यवरांचा यावेळी सन्मान करण्यात आला.यामध्ये वैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारे डॉ. मारोती निवृत्ती चौधरी (रा. चिंचखेडा), आणि अमानी येथे सध्या कार्यरत असलेले तलाठी जगन्नाथ महल्ले यांचे वडील सहकार क्षेत्रात दीर्घकाळ सेवा देणारे श्री. विश्वनाथ बळीराम महाले (से. नि. वरिष्ठ निरीक्षक, अकोला जिल्हा मध्यवर्ती बँक, वाशीम – रा. जांभरून महाली) तसेच शेती व सामाजिक

क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे श्री. संतोष सखाराम कोरडे (रा. चिंचखेडा) यांना “महाराष्ट्र साई पद्मश्री पुरस्कार 2026” देऊन गौरविण्यात आले.पुरस्कारप्राप्तांच्या कार्यामुळे समाजात सकारात्मक परिवर्तन घडत असून, त्यांच्या कार्याचा आदर्श इतरांसाठी प्रेरणादायी ठरत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.या कार्यक्रमास मान्यवरांची उपस्थिती लाभली असून, समितीचे अध्यक्ष श्री. सुदाम संसारे सर तसेच सल्लागार डॉ. माधव किसन वानखेडे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.संपूर्ण सोहळा उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात पार पडला.—🏆 पुरस्कार प्राप्त मान्यवर1. डॉ. मारोती निवृत्ती चौधरी(वैद्यकीय क्षेत्र) – रा. चिंचखेडा2. श्री. विश्वनाथ बळीराम महाले(सहकार व सामाजिक क्षेत्र )(से. नि. वरिष्ठ निरीक्षक, अकोला जिल्हा मध्यवर्ती बँक, वाशीम) – रा. जांभरून महाली3. श्री. संतोष सखाराम कोरडे(उत्कृष्ट शेतकरी व सामाजिक क्षेत्र) – रा. चिंचखेडा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *