
अंडर बायपास वरचे रस्ता दुभाजक अपघाताला निमंत्रण
वाशिम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)
दि,११:- मालेगांव ते वाशीम रोडवर अरूण बाबा इंगोले यांच्या समाधी जवळच्या अंडर पास रोडवरचे रस्ता दुभाजक कमी लांबी मुळे अपघाताला निमंत्रण देत आहे. या रस्त्यावर डाव्याबाजूने असलेले गतिरोधक चुकविण्यासाठी वाहन चालक दुसऱ्या बाजूने कमी लांबीच्या रस्ता दुभाजका वरून विरूद्ध दिशेने वाहन नेतात. या ठिकाणी कमी लांबीचे रस्ता दुभाजक वाहन चालकांसाठी अत्यंत धोकादायक ठरत आहे.एखाद्या दिवशी याच ठिकाणी मोठा अपघात होऊन त्यात जिवीत हाणी होण्याची शक्यता आहे. तेव्हा संबंधित विभागाने रस्ता दुभाजकाची लांबी मालेगावच्या रस्त्यापर्यंत वाढविण्याची मागणी वाहनचालक करीत आहेत. या ठिकाणी वाहन चालक हे गतिरोधक चुकविण्यासाठी उजव्या चुकीच्या दिशेने वाहन चालवतात.या रस्ता दुभाजकाची लांबी कमी आहे.त्यामुळे वाहन चालक विरुद्ध दिशेने वाहन घेतात व अनेक वेळा सध्या किरकोळ अपघात होत आहेत. एखाद्या दिवशी मोठा अपघात होऊन त्यात जीवित हानी होण्याची शक्यता वाढली आहे. चौकट : वाहन चालकांचा अनुभव.. डोणगांव, मालेगाव ते वाशिम या रस्त्यावरून मी दररोज ये-जा करतो . त्यामुळे अनेक वेळा किरकोळ अपघात होताना दिसून येतात,तर काही मोठे अपघात होता, होता टळत आहेत. संबंधित विभागाने याची गांभीर्याने दखल घेऊन रस्ता दुभाजकाची लांबी मालेगावच्या रस्त्याच्या उतारा पर्यंत वाढवावी. जेणेकरून वाहन चालक विरुद्ध दिशेने वाहन चालवणार नाहीत.तसेच दोन्ही बाजूंनी गतिरोधक टाकण्यात यावे. प्रा.किशोरकुमार खंडारे.डोणगाव.
