
राष्ट्रवादी किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष मनकर 13 मार्च रोजी शहरात
वाशिम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष ॲड वसंत मनकर ता 13 मार्च रोजी वाशिम जिल्ह्यात येत आहेत. 13 मार्च रोजी दुपारी 4.00 वाजता मालेगाव शहरातील श्री संत गजानन महाराज विद्या मंदिर येथे जिल्ह्यातील पदाधिकारी यांच्या बैठकिला ते उपस्थित राहणार आहेत यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किसान सभेच्या विविध पदाधिकारी यांना नियुक्ती पत्रे देण्यात येणार आहेत. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, माजी जि प अध्यक्ष तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक दिलीप जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किसान सभेचे विदर्भ विभागीय अध्यक्ष जगदीश जुनगरी , राज्य समन्वयक सरचिटणीस डॉ मंगेश देशमुख, संपर्क प्रमुख सरचिटणीस डॉ गणेश डोंगरे उपस्थित राहणार आहेत . कार्यक्रमाला माजी जि प सदस्य तथा रा कॉ चे मालेगाव तालुका अध्यक्ष सुनील चंदनशिव, राष्ट्रवादी काँग्रेसचे रिसोड तालुका अध्यक्ष तेजराव पाटील वानखेडे , वाशिम तालुका अध्यक्ष संजय मापारी, मंगरूळपीर तालुका अध्यक्ष आर के राठोड , मानोरा तालुका अध्यक्ष संजय राऊत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती गणेश उंडाळ , कृषी उत्पन्न बाजार समितीचे उप सभापती राजू गिद, संचालक उल्हास घुगे, डॉ नारायण शेंडगे, संजय दहात्रे, कृषी उत्पन्न बाजारसमितीचे संचालक, तालुका खवीसचे अध्यक्ष भगवानराव शिंदे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हा अध्यक्ष संतोष गोमाशे, गजानन टोंपे , वसंत मारोटकरं संतोष मडके ज्ञानेश्वर वाशिमकर, सेवाराम आडे , जावेद भवानिवाले आदी उपस्थित राहणार आहेत जिल्ह्यातील वाशिम, कारंजा, रिसोड, मंगरूळपीर, मानोरा मालेगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या सर्व आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तसेच स्व अजितदादा पवार यांच्या विचारावर विश्वास ठेवणाऱ्या नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किसान सभेचे जिल्हा अध्यक्ष प्रा अरविंद गाभणे यांनी केले आहे.
