
अकोला नेहरूनगरातील चिमुकल्याचा पहिला रोजा; मोहम्मद जैनचे सर्वत्र कौतुक लहान वयात मोठा संकल्प
अमिन शेख शेगाव
मोहम्मद जैनचा पहिला रोजा श्रद्धा आणि संयमाचे उदाहरण; चिमुकल्या मोहम्मद जैनचा पहिला रोजाअकोला , नेहरूनगर, अकोट फैल, अकोला येथील मोहम्मद जैन अब्दुल खालिक या चिमुकल्याने नववर्षीय वयात आज आपल्या जीवनातील पहिला रोजा (उपवास) यशस्वीपणे पूर्ण केला. इतक्या लहान वयात रोजा ठेवण्याचा संकल्प करून त्याने धार्मिक संस्कारांची सुरुवात केली असून, या घटनेमुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.मोहम्मद जैन याने पहिल्यांदाच संपूर्ण दिवस उपवास पाळत संयम, श्रद्धा आणि शिस्त यांचे उत्तम उदाहरण समाजासमोर ठेवले आहे. त्याच्या या उपवासामुळे कुटुंबीयांमध्ये विशेष आनंद असून, आई-वडिलांनी त्याचे मनोबल वाढवत त्याला प्रोत्साहन दिले. कुटुंबीयांनी सांगितले की, लहान वयातच धार्मिक परंपरेची ओळख व्हावी आणि चांगले संस्कार रुजावेत, या उद्देशाने त्याला रोजा ठेवण्याची प्रेरणा देण्यात आली.या प्रसंगी नातेवाईक, मित्रपरिवार तसेच परिसरातील नागरिकांनी मोहम्मद जैनचे अभिनंदन करत त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. लहान वयात उपवास ठेवण्याचा हा अनुभव त्याच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा व अविस्मरणीय क्षण ठरेल, असे मत व्यक्त करण्यात येत आहे.धार्मिक श्रद्धा, संयम आणि शिस्त यांचा संदेश देणारी ही घटना समाजासाठी प्रेरणादायी ठरत असून, लहान वयातच संस्कारांची बीजे रोवण्याचे महत्त्व या निमित्ताने अधोरेखित झाले आहेमराठी समाचार न्यूज 24 साठी अमिन शेख शेगाव
