मेंदुची वारी-आली आपल्या दारी वैद्यकीय शिबीर

मेंदुची वारी-आली आपल्या दारी वैद्यकीय शिबीर

प्रतिनिधी जळगाव जामोद

स्थानीक सेवाभावी स्व.मोहनलाल लालचंद विरवाणी फाऊंडेशनच्यावतीने मेंदुची वारी आली आपल्या दारी या मेंदु व अस्थी रुग्णांच्या तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि.22 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 ते 1 या वेळेत जैन भवन, महावीर अर्बंन बँक जवळ, जुना भाजी बाजार, जळगां जामोद येथे हे मेंदु व अस्थी रुग्ण तपासणी शिबिर होणार आहे.या शिबिरात महानगरातील ज्येष्ठ मेंदु विकार तज्ञ डॉ.नितीन विरवानी व अस्थी रोग तज्ञ डॉ.यश धनवानी हे रुग्ण तपासणी करणार आहेत. या शिबिरात डॉ.विरवानी हे डोकेदुखी, अर्धशिशी, मिरगी, अपस्मार, फिट, स्मृतीभ्रंश, अर्धांगवायूचा आजार, चक्कर येणे, तोल जाणे, मेंदुज्वर, कंपवात, डोळ्यांना दोन दोन दिसणे, डोळ्यात रक्तस्त्राव, चेहऱ्यावर शॉक लागण्यासारखे होणे, झोप न येणे आदी मेंदुचे आजार तथा स्पाईन प्रकारात पाठीच्या मणक्यांवरील शस्त्रक्रिया, मानदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, सायटिका, गादी सरकणे, गादी सरकून नस दाबणे, हाता पायाला मुंग्या येणे, टाच दुखणे, मणक्याला लागलेला मार, फॅक्चर, मणक्याची गाठ, चालतांना टाच दुखणे, सर्वाइकल स्पाँडिलायसिस आदींची तपासणी करण्यात येणार असून फिट मिरगीच्या रुग्णांसाठी समुपदेशन, लकव्याच्या रग्णांसाठी व्यायाम व मोफत औषधी वितरीत करण्यात येणार आहे. तर डॉ.धनवानी हे मोफत ऑथोपेडीक तपासणी करुन यात गुडघेदुखी, घुडघ्याचा आष्टीओ अर्थरायटिस, लिंगामेट दुखापत, खांद्याचे दुखणे व सर्व अस्थी रोगाचे तपासणी करणार आहेत. या शिबिरात गरजू रुग्णांसाठी अल्पदरात शस्त्रक्रिया व औषधांची व्यवस्था ही फाऊंडेशनच्यावतीने करण्यात आली आहे.
या शिबिराचा मेंदु रोग व मणक्याच्या रुग्णांनी मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहन स्व.मोहनलाल लालचंद विरवानी फाऊंडेशनच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *