
अमानी येथील पायदळ दिंडी सोहळा धामणगाव साठी ,मुंगसाजी माऊलीच्या गजरात प्रास्थान
वाशिम जिल्हा प्रतिनिधी( अनिल जाधव)
मालेगाव तालुक्यातील मौजे अमानी येथील संत मुंगसाजी महाराज पायदळ दिंडी सोहळा धामणगाव देव कडे आज दिनांक 18 फेब्रुवारीला सकाळी जय मुंगसाजी माऊलीच्या गजरात प्रस्थान करण्यात आली, सर्वप्रथम 17 च्या सायंकाळी या पालखी सोहळ्याचे गावातून मिरवणूक काढण्यात आली होती तर आज एक वाजता च्या दरम्यान अमानी येथील संत मुंगसाजी महाराज यांच्या संस्थांवरून हा पायदळ पालखी सोहळा संत मुंगसाजी माऊली यांच्या गजरात टाळ मृदंग वाजवून शिस्त पद्धतीने गाव बाहेर प्रस्थान करण्यात आले अगोदरच्या रात्री च्या फराळाची व्यवस्था रमेश अंभोरे व रामदास मोरकर यांच्या वतीने करण्यात आली होती तर आज दुपारी एक वाजता संस्थांवर सेने वाटपाचा कार्यक्रम समाधान ठाकरे व सहकार्याच्या वतीने करण्यात आला होता हा दिंडी सोहळा अमानी वरून पांगरी नवघरे मार्गे मसला खुर्द नंतर जोडगव्हाण येथे मुक्कामी राहणार असून येथे रात्री ह भ प ज्ञानबा महाराज मोकाशे अमानीकर यांचे कीर्तन व भजनाचा कार्यक्रम होणार आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा पायदळ दिंडी सोहळा धामणगाव साठी रवाना झाला असून अमानी येथे गावकऱ्यांच्या वतीने भव्य दिव्य संत मुंगसाजी महाराज यांचे मंदिर बांधलेले असून या दिंडी सोहळ्याचे हे २४ वेळ वर्ष असून येथे विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात तसेच भागवत सप्ताह चा कार्यक्रम सुद्धा ठेवण्यात येत असते या सर्व कार्यक्रमाकरिता गावकरी मंडळी सहकार्य करत असते, दिंडी सोहळ्यामध्ये महिला व भाविकांचा समावेश असून हा दिंडी सोहळा 24 फेब्रुवारीला धामणगाव येथे काल्याचे किर्तन झाल्यानंतर सांगता होणार आहे असे दिंडीचे आयोजक अशोकराव सरनाईक ,श्रावण झळके, गणपत लठाड, वैभव ठाकरे यांनी सांगितले
