
सातपुडा कॉलेजसमोर अवैध रेती वाहतूक पकडली १५ लाखांचा टिपर जप्त दोन ब्रास रेतीसह चालकावर गुन्हा दाखल
शेगाव तालुका प्रतिनिधी गजानन ददगाळ
शहरातील अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीवर कारवाईचा धडाका सुरूच असून स्थानिक गुन्हे शाखेने बुधवारी सायंकाळी सातपुडा कॉलेजसमोर धडक कारवाई करत अवैध रेती वाहतूक करणारा टिपर जप्त केला.दि. ११ फेब्रुवारी २०२६ रोजी सायं. ६.२५ ते ६.३९ वाजताच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या माहितीनुसार, भास्कर शिवराम बघे (वय ४४, रा. मानेगाव ता. शेगाव) हा आपल्या ताब्यातील पिवळ्या रंगाच्या अशोक लेलॅंड कंपनीच्या टिपर (क्र. MH 28 BB-3459, चेसीस क्र. MB1GWGCD6LRCF0497) मधून दोन ब्रास रेती अवैधरित्या वाहतूक करत असल्याचे आढळून आले.या कारवाईत अंदाजे १५ लाख रुपये किंमतीचा टिपर व सुमारे १० हजार रुपये किंमतीची दोन ब्रास रेती असा एकूण १५ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.याप्रकरणी पोस्टे शेगाव शहर येथे अप क्र. ९४/२०२६ अंतर्गत भा.न्या.सं. कलम ३०३ (२) सह गौण खनिज अधिनियम २१ (१), २१ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरतर्फे पोहेकॉ राजेंद्र टेकाळे यांनी लेखी फिर्याद दिली असून पुढील तपास पोहेकॉ रामदास घटे करीत आहेत.शहरात वाढत्या अवैध रेती उत्खननाविरोधात पोलिसांनी कडक भूमिका घेतली असून अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
