
चिखलीत महिलेची गळफास घेऊन आत्महत्या
सहसंपादक जावेद शहा
बैलजोडी परिसरात खळबळचिखली : बैलजोडी परिसरात आज दुपारी 40 वर्षीय महिलेनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली. मीना राजू महाजन असे मृत महिलेचे नाव असून घरात कोणी नसताना त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती पोलिसांनी दिली.दुपारी सुमारास मीना महाजन या घरात एकट्याच होत्या. बराच वेळ दरवाजा न उघडल्याने शेजाऱ्यांनी पाहणी केली असता त्या छताच्या पंख्याला साडीने बांधलेल्या अवस्थेत आढळल्या. तात्काळ पोलिसांना खबर देण्यात आली.चिखली पोलीस ताफा काही मिनिटांत घटनास्थळी दाखल झाला. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेण्यात आला व पुढील तपासासाठी उपजिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आला.आत्महत्यामागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसून कौटुंबिक की मानसिक तणावामुळे हा निर्णय घेतला, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.पोलिस सर्व बाजूंनी सखोल तपास करीत आहे
