जनता विद्यालयात ‘उडान’ स्नेहसंमेलनाचा विविध उपक्रमांनपिंपळगाव सराई

जनता विद्यालयात ‘उडान’ स्नेहसंमेलनाचा विविध उपक्रमांन पिंपळगाव सराई

प्रतिनिधी- गणेश मोरे स्थानिक जनता विद्यालय, पिंपळगाव
सराई येथे दि. १ जानेवारीपासून सुरू असलेल्या
‘उडान’ या वार्षिक स्नेहसंमेलनाचा समारोपीय
कार्यक्रम आज विविध धार्मिक, शैक्षणिक,
सांस्कृतिक व भावनिक उपक्रमांनी संपन्न झाला.
स्नेहसंमेलनाचे शेवटचे पुष्प चार भरगच्च
कार्यक्रमांनी गुंफले गेले. समारोपीय कार्यक्रमाची सुरुवात वै. ह. भ. प.मामासाहेब दांडेकर कृतज्ञता स्मृती सोहळ्याने झाली. या सोहळ्यात पारायण व्यासपीठाचे नेतृत्व माधवराव पाटोळे यांनी केले. गणेश महाराज वारंगळे यांनी गायनसाथ तर केशव महाराज ठाकरे यांनी मृदंगसाथ दिली. या वेळी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक डॉ. श्रीनिधी राजे मंचावर उपस्थित होते. बाल किर्तनकार कृष्णा महाराज मोरे यांनी संत
नामदेवांच्या ‘आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. या
अभंगावर आधारित भावपूर्ण किर्तन सादर करून
उपस्थितांची मने जिंकली.यानंतर सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत बक्षीस वितरण व समारोप कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव कैलास शेटे होते, प्रमुख उपस्थितांमध्ये सहाय्यक नियोजन अधिकारी अनिल शेवाळे यांच्यासह शिक्षण प्रसारक
मंडळाचे संचालक संतोषअप्पा खबूतरे, डॉ. श्रीनिधी राजे,
eiferer गोपाल बोरा, म. वा. पातूरकर विद्यालयाचे मुख्याध्यापक रमेश जाधव, आदर्शचे उपमुख्याध्यापक आरसोडे विविध शाळांचे मुख्याध्यापक, सल्लागार समिती सदस्य व शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात कैलास शेटे यांनी विद्यार्थ्यांना लहान यशातून मोठ्या
ध्येयांकडे वाटचाल करण्याचा संदेश दिला. अनिल शेवाळे
यांनी विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून प्रशासकीय सेवांसाठी
आतापासूनच मानसिक तयारी करण्याचे आवाहन केले.
प्राचार्य प्रमोद ठोंबरे यांनी स्पर्धेपुरते न थांबता स्वतःला सिद्ध
करण्यासाठी सातत्यपूर्ण मेहनतीचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन स्नेहसंमेलन प्रमुख सतीश शेटे
यांनी केले. दुपारी १ ते २.३० या वेळेत शालेय विद्यार्थ्यांसाठी
स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांनी
एकत्रित पंगतीत बसून भोजनाचा आनंद घेतला.
स्नेहसंमेलनातील हा क्षण विद्यार्थ्यांसाठी विशेष भावनिक व
आनंददायी ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *