
नॅशनल व्हॉइस मेडिया फोरमची तालुका कार्यकारणी गठीत,व जळगाव जामोद नगरपरिषदचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा सत्कार संपन्न..
प्रतिनिधी : बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद मध्ये आज नॅशनल व्हाईस मीडिया फोरम पत्रकार संघटनेची बैठक संपन्न झाली. यामध्ये प्रथमच जळगाव जामोद तालुकाध्यक्ष पदी अनुभवी पत्रकार, वासुदेव राजन कार यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी संघटना विषयी पत्रकारांना सखोल मार्गदर्शन नॅशनल व्हॉइस मीडिया फोरम या पत्रकार संघटनेचे अध्यक्ष उत्तम वानखडे यांनी केले. व पत्रकारांच्या पाठीशी सक्षमपणे उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले. पत्रकारांच्या भविष्यकालीन सर्व समस्यांवर मात करून पत्रकारांना शासकीय योजनांचा लाभ कसा मिळेल या संदर्भात सुद्धा सांगितले.तसेच नॅशनल मीडिया फोरमचे बुलडाणा जिल्हाध्यक्ष शेख चांद शेख कादर यांनी सुद्धा सखोल मार्गदर्शन केले.जळगांव जामोद तालुका अध्यक्ष पदी वासुदेव राजन कार यांची नियुक्ती करण्यात आली.तर अनेक पत्रकारांच्या विविध पदावर नियुक्त्या केल्या. तेव्हा उपस्थित जेष्ठ पत्रकार अभिमन्यू भगत, जफर खान ,नागेश भटकर, मंगेश टाकसाळ, गोपाल अवचार पाटील, संतोष कुलथे ,विजय वानखडे ,शिवदास सोनवणे मनिष ताडे हे व इतर पत्रकार उपस्थित होते.आणि या बैठकीत नगरपरिषद मध्ये नुकतेच निवडून आलेले नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक यांचा दिनांक 28 डिसेंबर 2025 येथील विश्रामगृहात नॅशनल व्हाईस मीडिया फोरमच्या पत्रकार बांधवांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.सत्कार समारोप कार्यक्रमास शहरातील विविध माध्यमांचे पत्रकार, नगरपरिषदेचे नवनिर्वाचित प्रतिनिधी तसेच मान्यवर नागरिक उपस्थित होते.या प्रसंगी नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा पुष्पगुच देऊन गौरव करण्यात आला.सत्कार समारंभ सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडला असून कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक करण्यात आले.
