जिजाऊ ज्ञान मंदिरात दोन दिवसीय स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

जिजाऊ ज्ञान मंदिरात दोन दिवसीय स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न


जावेद शहा दि. 27 डिसेंबर राजर्षी शाहू चॅरिटेबल ट्रस्ट सुंदरखेड बुलढाणा द्वारा संचालित जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल ॲड ज्युनिअर कॉलेज पळसखेड भट रायपूर येथे दि. 25 व 26 डिसेंबर रोजी दोन दिवसीय स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्था अध्यक्ष मा संदीप दादा शेळके होते तर उद्घाटक म्हणून इंडियाज आयर्न मॅन ॲड. शरद राखोंडे व इंजिनिअर संदीप एस शेळके होते. तर प्रमुख उपस्थितीमध्ये भाऊसाहेब शेळके, मा.मालतीताई शेळके अध्यक्षा राजर्षी शाहू मल्टीस्टेट, महाराष्ट्र शासनाचा शिव छत्रपती क्रिडा पुरस्कार प्राप्त मा.अनुराधा सोळंके मॅडम, बोरे सर, घुसळकर सर, रायपुर पोलिस स्टेशनचे ठाणेदार निलेश सोळंके, गजानन वतपाव सरपंच मातला, नागेश पाटील सरपंच पांगरी, गजानन उबरहंडे, सुनिल गवते, संचालक कृ. उ. बाजार समिती, सुमंथा पाटील मातला, जनार्दन सुसर सरपंच शिरपूर, शामभाऊ सावळे, सुनिल बिलारी सरपंच केसापूर, शरदभाऊ चव्हाण आदी उपस्थित होते.
प्रसंगी सिद्धी विठ्ठल सोनूने कळसूबाई शिखर सर करणारी चिमुकली हिचा सत्कार करण्यात आला. यावेळी अतीथीय भाषणात ॲड राखोंडे यांनी जगातील सर्वात कठीण स्पर्धा ट्रायथलॉन स्पर्धा 17 तासात कशी पुर्ण केली याबद्दल विद्यार्थ्यांना सांगितले, ज्यात 4 किमी पोहणे, 180 किमी सायकलींग व 42 किमी मॅरेथॉन असते. यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत असतांना तुम्हाला या ठिकाणी स्पोर्ट्स साठी खुप वाव आहे. स्पोर्ट्स हब म्हणून आपली शाळा ओळखल्या जाते. याचा निश्चित फायदा विद्यार्थ्यांनी घ्यावा. प्रमुख अतिथी म्हणून संवाद साधतांना ठाणेदार सोळंके साहेब म्हणाले की, आई-वडीलांनी आपल्या पाल्यांकडे अधिक लक्ष देण्याची आज गरज आहे. शिक्षक-पालकांच्या मदतीने विद्यार्थी घडत असतो. एवढं चांगलं सर्वगुणसंपन्न शिक्षण या संकुलात विद्यार्थ्यांना मिळते. यामुळे तुमचं भविष्य उज्ज्वल आहे.
आपल्या मनोगतात अनुराधा सोळंके ह्या म्हणाल्या की मी खेळाडूंचा संघर्ष खुप मोठा असतो. व्हीलचेअर तलवारबाजी मध्ये मी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक मिळवलं जागतीक रॅंक मिळवली. एका दिव्यांग खेळाडू साठी ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि आज मला या जिजाऊ संकुलात येऊन खुप आनंद झाला. एका ग्रामीण भागात 27 खेळाडू दरवर्षी राज्यस्तरावर जातात ही खुप मोठी गोष्ट आहे. आई-वडिलांनी विद्यार्थ्यांना पाठबळ द्या कदाचित उद्याचे ऑलिंपिक खेळाडू यातून असतील. असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात संदीप दादा शेळके म्हणाले की, आपल्या जिजाऊ ज्ञान मंदिरच्या विद्यार्थ्यांसमोर विवीध क्षेत्रातील जिल्ह्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीमत्वांना बोलावून त्यांच्या अनुभवाचा फायदा विद्यार्थ्यांना देण्याचा आमचा प्रयत्न असतो. अशा व्यक्तीमत्वांना भेटण्याने विद्यार्थ्यांच्या जिवनामध्ये खुप बदल घडत असतो. तसेच श्रीलंका, चिन, म्यानमार, भुतान, टोगो, बांग्लादेश आदी खेळाडूंशी खेळून आपल्या जिजाऊ ज्ञान मंदीरचा खेळाडू पदक मिळवतो ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. शालेय राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळून चमकतो आहे. याचा परिसरातील नागरिकांना, पालकांना अभिमान वाटला पाहिजे. आपल्या शाळेचे क्रिडा प्रशिक्षक भुषण सिरसाट यांनी गेल्या अनेक वर्षांपासून यासाठी मेहनत घेतली आहे. निश्चितच या संकूलातून उद्याचे ऑलिंपिक खेळाडू घडतील. विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुण विकसित करण्यासाठी आई – वडीलांबरोबरच शिक्षकांचीही गरज लागते. तसेच जिजाऊ च्या लेकी शिकल्या पाहिजे. तिच्या अंगी असलेले गुण विकसित झाले पाहिजे. भाऊसाहेबांची 35 वर्षांची सेवेचा अनुभव व जिजाऊ ज्ञान मंदिर स्थापण्याचा उद्देश आज या संकुलाकडे पाहून सफल होत असल्याचे जाणवते. असे ते याप्रसंगी म्हणाले. यावेळी शालेय जिल्हा विभाग व राज्य तसेच आंतरराष्ट्रीय क्रिडा स्पर्धेत विजयी विद्यार्थ्यांचा तसेच विज्ञान प्रदर्शनात यशस्वी ठरलेल्या व दहावी बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावर्षीचा स्टुडंट्स ऑफ दी इयर मो. अयान मो. जावेद हा ठरला तर टिचर ऑफ दि इयर हा किताब स. शिक्षीका प्रियंका लहाने यांना मिळाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे प्राचार्य किशोर सिरसाट यांनी केले तर सुत्रसंचलन ज्ञानेश्वर भुसारी, किरण जाधव व शरद सोनूने यांनी केले. स्नेहसंमेलनासाठी सर्व कर्मचारी यांनी मेहनत घेतली.
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *