
केसापूर येथील पुरुषोत्तम शिवाजी चव्हाण विहिरीत पडून त्यांचा मृत्यू
जावेद शहा : आज दिनांक 20/12/25 रोजी सायंकाळी 4/30 वाजताचे सुमारास केसापूर येथील पुरुषोत्तम शिवाजी चव्हाण वय 30 वर्ष हे शेतात चक्कर मारण्यासाठी गेले असता शेतातील विहिरीत पडून त्यांचा मृत्यू झाल्या बाबत रायपूर पोलीस स्टेशन यांना घटनेची माहिती मिळताच रायपूर पोलीस स्टेशन चे ठाणेदार निलेश सोळंके asi अनिल घाटे, राहुल जाधव, कळमकर यांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून गावाकऱ्यांच्या मदतीने सदर चा मृतदेह बाहेर काढून शववीच्छेदना करीता जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा येथे पाठविण्यात आला असून मृतक याचा चुलत भाऊ अरुण जगन्नाथ चव्हाण रा केसापूर यांच्या फिर्याद वरून पोलीस स्टेशन रायपूर येथे अकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात आली असून पुढील तपास रायपूर पोलीस करीत आहेत.
