बिरसा मुंडा जयंती जनता विद्यालयात विविध उपक्रमांनी उत्साहात साजरीपिंपळगाव सराई

बिरसा मुंडा जयंती जनता विद्यालयात विविध उपक्रमांनी उत्साहात साजरीपिंपळगाव सराई,

बुलढाणा तालुका प्रतिनिधी जावेद शहा

ता. बुलडाणा – जनता विद्यालय पिंपळगाव सराई येथे आदिवासी समाजाचे महान क्रांतिकारी, स्वातंत्र्यसेनानी व सामाजिक सुधारक धरती आबा बिरसा मुंडा यांची जयंती १५ नोव्हेंबर रोजी विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. ‘जल, जंगल, जमीन’ या आदिवासींच्या मूलभूत हक्कांसाठी लढा देणाऱ्या या अमर वीराला आदरांजली अर्पण करण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य प्रमोद ठोंबरे,

पर्यवेक्षक संजय पिवटे, कार्यक्रमाच्या अध्यक्षा कु. सोनम मुकलवार आणि प्रमुख वक्त्या कु. रिया देशमुख यांच्या हस्ते बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून झाली. दोन मिनिटे शांततेचे पालन करून उपस्थितांनी आदरांजली वाहिली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तिपर गीताने वातावरण भावूक झाले.इतिहास विभागातील शिक्षकांनी बिरसा मुंडा यांच्या जीवनकार्याचा सविस्तर परिचय करून दिला. ‘उलगुलान’ आंदोलनाची पार्श्वभूमी, ब्रिटिशांविरुद्धचा संघर्ष, आदिवासी समाजाचे हक्क, तसेच समाजजागृतीसाठी त्यांनी केलेल्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. यानंतर विद्यार्थ्यांनी भाषण, घोषवाक्य प्रस्तुती, तसेच ‘धरती आबा बिरसा’ या विषयावर सादर केलेल्या पोस्टर आणि कोलाज प्रदर्शनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शाळेच्या परिसरात “आदिवासी संस्कृती आपली शान” आणि “बिरसा मुंडा – निसर्गाचे रक्षक” अशा घोषणांनी जयघोष घुमत होता. शिक्षकांनी पर्यावरण संवर्धन, निसर्गप्रेम, सामाजिक न्याय आणि समानतेच्या मूल्यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.प्राचार्य प्रमोद ठोंबरे यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणात सांगितले की, “बिरसा मुंडा हे केवळ आदिवासी समाजापुरते मर्यादित नसून समस्त

भारतीयांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांचे संघर्षमय जीवन न्यायासाठी लढण्याची आणि निसर्गाचे रक्षण करण्याची शिकवण देते.” त्यांनी विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणे शिक्षण घेण्याचा सल्ला दिला.संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन सौ. वैशाली मांजाटे यांनी उत्तमरित्या पार पाडले. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन १० वी ‘अ’ मधील कु. श्रद्धा बैरागी हिने तर आभार प्रदर्शन कु. अनन्या पाटील हिने केले. अखेर राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *