
जिल्हास्तरीय कुराश स्पर्धेत जिजाऊ ज्ञान मंदिरची विद्यार्थीनी विजयी
बुलढाणा तालुका प्रतिनिधी जावेद शहा
दि. 06 नोव्हेंबर राजर्षी शाहू चॅरिटेबल ट्रस्ट सुंदरखेड बुलढाणा द्वारा संचालित जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल ॲड ज्युनिअर कॉलेज पळसखेड भट रायपूर येथील विद्यार्थीनी जान्हवी भिवटे चिखली येथे झालेल्या जिल्हास्तरीय कुराश क्रिडा स्पर्धेत विजयी झाली.सविस्तर वृत्त असे की, जिल्हास्तरीय शालेय कुराश क्रिडा स्पर्धेचे चिखली क्रिडा संकुल येथे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल ॲड ज्युनिअर कॉलेज पळसखेड भट रायपूर ची विद्यार्थिनी जान्हवी संतोष भिवटे 19 वर्षे वयोगटात सहभागी झाली होती. तिने प्रत्येक सामन्यात प्रतिस्पर्धी स्पर्धकांना नमवत विजयी सलामी दिली. या विजयामुळे तिची विभागीय कुराश स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या विजयामुळे आणखी एक सन्मान शाळेस प्राप्त झाला असल्याची प्रतिक्रिया संस्था अध्यक्ष मा. संदीप दादा शेळके यांनी दिली. या विजयासाठी शाळेचे क्रिडा प्रशिक्षक भुषण सिरसाट यांनी मेहनत घेतली. तसेच शाळेचे प्राचार्य किशोर सिरसाट, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करीत पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
