कायदा-सुव्यवस्थेवर चाललेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर पोलिस विभागाने मोठा बदल

कायदा-सुव्यवस्थेवर चाललेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर पोलिस विभागाने मोठा बदल केला आहे. ठाणेदार संग्राम पाटील यांची बदली करून त्यांना बुलढाणा सायबर पोलिस स्टेशनमध्ये पाठवण्यात आले आहे. त्यांच्या जागी भूषण गावंडे हे नवीन ठाणेदार म्हणून पदभार स्वीकारणार आहेत.

बुलढाणा जिल्हा तालुका प्रतिनिधी जावेद शहा

चिखली (जि. बुलढाणा) येथे कायदा-सुव्यवस्थेवर चाललेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर पोलिस विभागाने मोठा बदल केला आहे. ठाणेदार संग्राम पाटील यांची बदली करून त्यांना बुलढाणा सायबर पोलिस स्टेशनमध्ये पाठवण्यात आले आहे. त्यांच्या जागी भूषण गावंडे हे नवीन ठाणेदार म्हणून पदभार स्वीकारणार आहेत.संग्राम पाटील यांच्या कार्यकाळात चिखलीत गुन्हेगारीवर कडक कारवाई करण्यात आली होती. अवैध धंदे, दहशत माजवणारे गुंड, तसेच चोर्‍या व मारामारीच्या घटना त्यांनी आळा घातला होता. त्यांच्या कडक कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये भीती होती.तथापि, त्यांच्या अचानक झालेल्या बदलीमुळे अनेक नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. आता नव्या ठाणेदार भूषण गावंडे यांच्यावर नागरिकांच्या सुरक्षेची आणि कायदा-सुव्यवस्थेची मोठी जबाबदारी येणार आहे. संग्राम पाटील यांनी तयार केलेली शिस्त आणि पोलिसांची कार्यपद्धती टिकवून ठेवणे हे त्यांच्यासमोर आव्हान असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *